जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:57 PM2023-09-27T23:57:45+5:302023-09-27T23:58:01+5:30

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

112 orphaned bodies in eight months in the district | जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 
अलिबाग - रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरिकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात ७ ते ८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हाण समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. याचबरोबर गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले असून, गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात १ जानेवारी ते २०ऑगस्ट या काळावधीत रायगड जिल्हा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ११२ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवित गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. सापडलेल्या ११२ बेवारस मृतेहांपैकी ८६ मतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांनी यश मिळाले असून, उर्वरित २६ बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बेवारस मृतदेह मोठ्या संख्येने सापडत आहेत. चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते  २० ऑगस्टपर्यंत रायगड जिल्ह्यात ११२ बेवारस मृतदेह सापडले आहेत. या सर्व मृतदेहांची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.

काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता -
रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणाने हे सिद्ध झाले आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

बेवारस मृतदेहावर अत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर -
सापडलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह हे वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जातात. ३ ते ७ दिवसात या बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करायचे असते. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. परिणामी मृतदेह सडू लागतात. या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. अंत्यविधीचा खर्चही पोलिसांना करावा लागतोे. तर काही वेळेस स्थिनिक स्वराज्य संस्थांची बेवारस मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पोलीस मदत घेतात.

Web Title: 112 orphaned bodies in eight months in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.