उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:04 AM2018-08-18T03:04:50+5:302018-08-18T03:05:02+5:30
उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले.
उरण - उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले. पारसी नववर्षानिमित्त पतेतीला याठिकाणी पारसी बांधव आवर्जून येतात.
पारशी समाज अग्नी देवतेची पूजा करत असल्याने उरण येथील पारशी मंदिरात २४ तास अग्नी पेटत असतो. यासाठी बाभळाची लाकडे किंवा चंदनाच्या लाकडांचा वापर केला जातो. उरण पारशी मंदिराचा वर्धापन दिन हा ८ आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो. त्या दिवशी येथे यात्रेचे स्वरूप येते. जगभरात केवळ ६३ हजार पारशी समाजाचे नागरिक असून दिवसेंंदिवस त्यांंची संख्या कमी होत चालली आहे. भारतात केवळ ८ पारसी मंदिरे आहेत. त्यातील ४ मंदिरे मुंबईत आहेत. धोबी तलाव येथे दोन व ग्रॅण्टरोड येथे दोन व नवसारी व गुजरातमध्ये उडवाडा येथे मोठे मंदिर आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पारशी नववर्ष साजरा केले जात असल्याचे उरणमधील मंदिराची देखभाल करणारे केरसी बेहरामशाह सुई यांनी सांगितले.