दरडग्रस्तांसाठी ११८ कोटी!

By admin | Published: July 20, 2015 03:27 AM2015-07-20T03:27:41+5:302015-07-20T03:27:41+5:30

अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबे बेघर झाली होती

118 Crore for the Arrested! | दरडग्रस्तांसाठी ११८ कोटी!

दरडग्रस्तांसाठी ११८ कोटी!

Next

महाड : अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये महाड व पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबे बेघर झाली होती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या भूगर्भतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाड व पोलादपूर तालुक्यांतील ४८ गावांना दरडींचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरडींचा संभाव्य धोका असलेल्या सर्व ठिकाणच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता असून यासाठी ११८ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.
या प्रस्तावानुसार महाड तालुक्यात ३४ तर पोलादपूर तालुक्यात १४ गावे दरडग्रस्त असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा (१३० घरे, १३० कुटुंबे), नडगावतर्फे बिरवाडी-काळभैरवनगर (३५ घरे, ७० कुटुंबे), रायगडवाडी-हिरकणीवाडी (६० घरे, ८५ कुटुंबे), सव (८४ घरे, १०५ कुटुंबे), लोअरतुडीत नागोली कोंड (३५ घरे, ५५ कुटुंबे), जुईबुद्रुक (७० घरे, ९० कुटुंबे), कुंबळे (९५ घरे, ११० कुटुंबे), वराठी-वराठी बौध्दवाडी (३५ घरे, ३५ कुटुंबे), कोसंबी (२५ घरे, ४० कुटुंबे), वलंग (१६५ घरे, १९५ कुटुंबे), रोहन (३५ घरे, ५५ कुटुंबे), खैरे तर्फे तुडील आदिवासीवाडी (२५ घरे, ४० कुटुंबे), मोहोत (२२ घरे, २२ कुटुंबे), सह्याद्रीवाडी आंबेशिवथर (१९ घरे, १९ कुटुंबे), पारमायी (५७ घरे, ५७ कुटुंबे), माझेरी (४० घरे, ४० कुटुंबे), कुर्ते दंडवाडी (२२ घरे, २३ कुटुंबे), आंबिवली पानेरीवाडी (२३ घरे, २५ कुटुंबे), मुठवली (१०६ घरे, १५० कुटुंबे), कडसरी लिंगाणा (६ घरे, ९ कुटुंबे), मांडले ज्ञानेश्वर वाडी (१७ घरे, २५ कुटुंबे), चोचिंदे कोंड (६० घरे, ८० कुटुंबे), वाकी बुद्रुक नाणेमाची (२७ घरे, ८१ कुटुंबे), कोथेरी जंगमवाडी (२८ घरे, २८ कुटुंबे), पिंपळकोंड (८ घरे, ८ कुटुंबे), शिंगरकोंड-मोरेवाडी (९ घरे, १० कुटुंबे), कोंडीवते-जुना गावठाण (३८ घरे, ४० कुटुंबे), रावतळी सोनघर (३३ घरे, ३५ कुटुंबे), मुमुर्शी आंब्याचा कोंड (३३ घरे, ३६ कुटुंबे), मुमुर्शी बौध्दवाडी (११ घरे, ११ कुटुंबे), तर पोलादपूर तालुक्यात लोहारे चव्हाणवाडी (२२ घरे, ३५ कुटुंबे), सवाद, कालवली, चरई भोईआळी-सोनारआळी, पोलादपूर सिध्देश्वर आळी- खालची बाजारपेठ-सावित्रीनगर, भोगा व येलंगेवाडी, कोतवालखुर्द , क्षेत्रपाल आमलेवाडी, परसुले धनगरवाडी, कोतवाल बुद्रुक संकपाळवाडी, कोंढवी मूळगाव, तुटवली, केवनाळेआंबेमाची या गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याने तेथील कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा महसूल विभागाचा प्रस्ताव आहे. (वार्ताहर)

Web Title: 118 Crore for the Arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.