एकाच दिवशी १२ घरफोड्या !
By admin | Published: April 10, 2016 01:14 AM2016-04-10T01:14:09+5:302016-04-10T01:14:09+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आदगाव व सर्वे या दोन गावांमध्ये बुधवारी एकाच रात्री १२ घरफोड्या झाल्या आहेत. याबाबत दिघी सागरी पोलीस
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आदगाव व सर्वे या दोन गावांमध्ये बुधवारी एकाच रात्री १२ घरफोड्या झाल्या आहेत. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिघी परिसरात महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी असाच प्रकार घडला होता, त्यावेळी चोरांनी १० घरफोड्या केल्या होत्या. आदगाव येथील सुवर्णा सुभाष मोरे, किशोर तोडणकर, केतन विनायक लाड, रंजना रत्नाकर मोरे, सूर्यकांत शांताराम मोडिसंग, उज्ज्वला उद्धव विलणकर, निशांत सुधाकर मोरे, तर सर्वे गावामध्ये प्रभाकर जाणू देवधरे, नारायण धोडू कदम, मनीष रमेश नायनेकर, शंकर धोडू नायनेकर अशी घरफोडी झालेल्या घरमालकांची नावे आहेत. यातील सुवर्णा सुभाष मोरे यांच्या घरून सोन्याच्या कानातल्या कुड्या, माळ व काणसाखळ्या असा अंदाजे ८६ हजार ५०० रुपये किमतीचा माल चोरून नेला.
प्रभाकर जानू देवधरे यांच्या घरून सोन्याचे लॉकेट, ३ अंगठ्या, कीट हार, गोलवाटी, दोन मनी, मोत्याची नथ, चांदीची कंबरेची साखळी, गणपती शिका, मनगटी घड्याळे २ व रोख ३० हजार रु पये असा एकूण १ लाख ९० हजारांचा ऐवज व रोख रक्कम तर रंजना रत्नाकर मोरे यांच्या घरून रोख २,५०० रु पये घेऊन पोबारा केला.