खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:50 AM2019-01-23T04:50:48+5:302019-01-23T04:50:52+5:30

द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्यामुळे लेनवर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून वेगात आलेल्या खासगी बजने जोरदार धडक दिली.

12 passengers injured in private bus collision | खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी

खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी

googlenewsNext

मोहोपाडा : द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्यामुळे लेनवर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून वेगात आलेल्या खासगी बजने जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात खालापूर हद्दीत मंगळवारी सकाळी घडला.
व्हीआरएल कंपनीची खाजगी बस ३५ प्रवासी घेऊन कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बस खालापूर हद्दीतील टेंभरी गावानजीक आली असताना पुढे असलेल्या कंटेनरचा टायर अचानक फुटल्यामुळे ती अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनर लेन क्रमांक एकवर थांबविला. मात्र, पाठीमागून येणारा बसचालक अब्दुल मोकाशी (४१, रा.बेळगाव) याला वेगवान बसवर नियंत्रण न करता आल्यामुळे कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात बसचालकासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत.

Web Title: 12 passengers injured in private bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.