कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. छाननीत १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.१६ आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार १९ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होती, यामध्ये १३ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. २१ आॅगस्टपर्यंत पत्रे मागे घेण्याची तारीख आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. सोमवारी छाननीमध्ये १३ ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ६ प्रभागातील १७ जागांसाठी १०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती, त्यामध्ये ९८ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ३ अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.उमरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ५ प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यामध्ये ४७ वैध ठरली आहेत; तर ३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ४ प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. ३० वैध ठरली आहेत तर १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी दिली.जामरुंगमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ९ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, १६ वैध ठरली आहेत; तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.रजपे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती ती सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ७ जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यापैकी २४ वैध ठरली आहेत तर १ अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.- सध्या ५ सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत तर ५ ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. १९ आॅगस्ट रोजी झालेल्या छाननीमध्ये सदस्यांमधील २१५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले आहेत तर १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरले आहेत. २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.
छाननीत १२ अर्ज ठरले अवैध; कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:30 AM