केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान
By वैभव गायकर | Published: December 29, 2023 04:50 PM2023-12-29T16:50:17+5:302023-12-29T16:50:49+5:30
तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि.२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
वैभव गायकर,पनवेल : तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.कॉस्मेटिकसाठी लागणार कच्चा माल बनविणाऱ्या या कंपनीचे शेकडो कोटींचे या घटनेत नुकसान झाले असुन या कंपनीत तसेच कंपनीशी जोडले गेलेले जवळपास १२०० कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
केमिकलची कंपनी असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट धरला.यावेळी जवळपास 200 टन ज्वलनशील रॉ मटेरियल कंपनीत असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट धरला.मध्यरात्री 2 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तो पर्यंत अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करून आग विझवत होते.कंपनीला लागणाऱ्या आगीच्या घटनांबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे.यापूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेत देखील कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेची चौकशीची मागणी देखील जोर धरू लागली आहे.तळोजा एमआयडीसी मध्ये आद्योगिक सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही ? याबाबत देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
या कंपनीत बनवला जाणारा कॉस्मेटिक चा रॉ मटेरियल इतर कंपन्यांना सप्लाय केला जात होता.त्यामुळे या साखळीतील सर्वच कामगार बेरोजगार होणार असल्याचे या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले.दरम्यान या घटनेबाबत अधिक माहितीसाठी डेप्युटी डीआयआर आरिफ तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील दोन दिवसात घटनेबाबत माहिती देता येईल.आमचा तपास सुरु असुन दोन दिवसात घटनेची कारणे ,नुकसान याबाबत माहिती देता येईल असे सांगितले. चौकट - कंत्राटी कामगार रस्त्यावर या घटनेमुळे कंत्राटी कामगारांना सर्वात मोठा फटका बसणार आहे.अचानक काम थांबल्याने