- जयंत धुळप
अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील इंदापूर (माणगाव) ते पोलादपूर या टप्प्यातील चौपदरीकरणाकरिता भूमी संपादन प्रक्रिया गतिमान झाली आहे. माणगाव तालुक्यात २६ गावांतील ६ हजार सहहिस्सेदार शेतकºयांची १०३ हेक्टर तर महाड व पोलादपूर तालुक्यांतील २१ गावांतील ६१३५ सहहिस्सेदार शेतकºयांची १२५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी अनुक्रमे ७०८ कोटी आणि ५३६ कोटी असा एकूण १२४३ कोटी रुपयांचा आर्थिक मोबदला माणगाव, महाड व पोलादपूर या तीन तालुक्यांमध्ये वितरीत होणार आहे.गेल्या तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्रीच्या दराची सरासरी किंवा सरकारी रेडिरेकनर दर यापैकी जो अधिक असेल तो दर शेतकºयांच्या जमिनीला देण्यात येतो. त्यांच पद्धतीने येथील शेतकºयांना जमीनभाव देण्यात आला असून, मोबदला वाटपाचे काम सुरू झाले असून, महाड व पोलादपूर मध्ये सुमारे ६० टक्केपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे.महाड तालुक्यांतील गांधारपले गावांत ६७१ सहहिस्सेदार शेतकºयांची जमीन संपादित करण्यात येत असून त्यांना १६९० रुपये प्रति चौरस मीटर दर देण्यात आला आहे. वीर, दासगाव, वहूर, केबुर्ली, राजेवाडी, कांबळेतर्फे महाड या गावांमध्ये ४९० रुपये प्रति चौरस मीटर, महाड व चांभारखिंड येथे ६०९० रुपये प्रति चौ. मि., नडगाव त. बिरवाड येथे ७४० प्रति चौ. मी., तर चांढवे खुर्द आणि चांढवे बुद्रुक येथे ६०० प्रति चौ. मी. दर देण्यात आला आहे.पोलादपूर तालुक्यात पोलादपूर येथे सर्वाधिक १०३० रुपये प्रति चौ.मी. दर देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी पार्ले, लोहारे, चोळई येथे ६१० तर सडवली, कातळी, भोगाव बुद्रुक, धामण देवी व भोगाव खुर्द येथे ४६० रुपये प्रति चौ. मीटर दर देण्यात आला आहे.माणगाव तालुक्यातील २६ गावांतील ७७२ खातेदार शेतकºयांच्या ६ हजार सहहिस्सेदारांची १०३.४२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, एकूण ७०८ कोटी मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मोबदला वाटपास ४ जुलैपासून प्रारंभ करून आतापर्यंत १४२ कोटी रुपयांचे वाटप सबहिस्सेदारांना करण्यात आले असल्याची माहिती माणगाव उप विभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी दिली आहे. वारसनोंदी रीतसर केल्या नसल्याने काही शेतकºयांना थेट आर्थिक मोबदला देण्यात अडचणी येतआहेत.दरम्यान, अशा शेतकºयांची आता पर्यंत एकूण २५० कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली असल्याचे तिडके यांनी सांगितले. क्षेत्र निश्चिती तसेच वारस नोंदी बाबत संबंधित शेतकºयांना मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे. त्यांच्या नोंदी रीतसर होऊन वारस निश्चिती होताच त्यांना न्यायालयात जमा रक्कम प्राप्त होऊ शकणार आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यानच्या संबंधित शेतकºयांना मोबदला वाटप करण्याचे काम सप्टेंबर २०१७ अखेर पूर्ण होणार आहे.माणगाव तालुक्यांतील २६ गावांतील ७७२ खातेदार शेतकºयांच्या ६ हजार सहहिस्सेदारांची १०३.४२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. एकूण ७०८ कोटी मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मोबदला वाटपास ४ जुलैपासून प्रारंभ करुन आतापर्यंत १४२ कोटी रुपयांचे वाटप सबहिस्सेदारांना करण्यात आले. तर उर्वरित वाटप लवकरच पूर्ण होईल.- बाळासाहेब तिडके,उप विभागीय महसूल अधिकारी