१३ प्रादेशिक पक्षही इंडिया आघाडीत, शेकापचे जयंत पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:05 AM2023-08-31T02:05:10+5:302023-08-31T05:49:01+5:30
मुंबई हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीत १३ प्रागतिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.
अलिबाग : भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या इंडिया आघाडीत राज्यातील १३ प्रादेशिक पक्ष हेसुध्दा सहभागी झाले आहेत. मुंबई हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीत १३ प्रागतिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.
शेकापच्या वर्धापन दिनी राज्यातील १३ प्रादेशिक पक्षांची मोट आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात बांधण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनी बनवलेल्या आघाडीत सामील होण्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते. आता १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला सर्व प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
१३ प्रादेशिक पक्ष
शेकाप, स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.