शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नवरा-बायकोच्या भांडणाच्या 135 तक्रारी, रायगड पोलिसांकडून ‘भरोसा’ सेल सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:34 PM

Raigad : कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते.

-  निखिल म्हात्रे

अलिबाग : हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मक काम करण्याची गरज आहे.कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाइकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारीरिक व मानसिकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा, घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविला होता. याला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. 

३२  प्रकरणांत समेट भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा अभ्यास करून तक्रारदारांना समुपदेशन करण्यात आले. तक्रारदार व समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे १३५ तक्रारींपैकी  ३२  प्रकरणांत समेट घालण्यात भरोसा सेलला यश आले आहे. जिल्ह्यातील महिला व युवतींच्या छेडछाडीचे गुन्हे पाहता दामिनी पथकाला पुन्हा ॲक्टिव्ह होणे गरजेचे आहे, अन्यथा भरोसा सेलवर महिलांना ‘भरोसा’ राहणार नाही. 

नवरा - बायकोतील भांडणाची कारणेघरात वेळ न देणे, सतत मोबाइलचा वापर, एकमेकांमधील गैरसमज ही नवरा - बायकोतील भांडणाची मुख्य कारणे आहेत. यामुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण होत आहे.

हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करूनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे गरज आहे.- अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड

टॅग्स :Raigadरायगड