खंडणीप्रकरणी १४ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:16 AM2018-07-17T02:16:25+5:302018-07-17T02:16:33+5:30
कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीमधील धुळेवाडी येथील एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी १0 लाखांची मागणी केली होती.
कर्जत : कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीमधील धुळेवाडी येथील एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी १0 लाखांची मागणी केली होती. खंडणीची रक्कम न दिल्याने विजेचे खांब टाकण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल असून आरोपीत शिवसेनेचे कर्जत तालुका उपप्रमुख हे प्रमुख आरोपी आहेत. सावेळे ग्रामपंचायत हद्दीत धुळेवाडी येथे नवी मुंबईत राहणारे मोहंमद साद मोहंमद इरफान मोनारिया यांनी जमीन खरेदी केली आहे. त्यांनी त्या जमिनीत बाटलीबंद पाणी बनविण्याचा कारखाना काढण्याची तयारी पूर्ण केली होती. त्यासाठी वीज आवश्यक असल्याने वीज खांब टाकले जात असताना त्यांना धुळेवाडी येथील शेतकºयांनी त्यास आपली जमीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकरी आणि जमीन खरेदी करणारे यांच्यात वाद झाला होता. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल होती. मात्र तरी देखील विजेचे खांब टाकण्याचे काम मोनारिया यांच्याकडून सुरू होते. त्यामुळे साहजिकच स्थानिक शेतकरी हे विजेचे खांब टाकण्यास विरोध करायला गेले. त्या ठिकाणी मोनारिया आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली.
संबंधित बाबतीत मोहम्मद मोनारिया यांनी कर्जत पोलीस ठाण्यात खंडणी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्र ार दाखल केली. कंपनी सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी आपण पूर्ण केली नाही म्हणून १४ जणांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच विजेचे खांब टाकण्याचे काम करणाºया कामगारांना लाठी, काठ्या, फरशी, कुºहाड यांच्या साहाय्याने मारहाण केली, असे आपल्या तक्र ारीत मोनारिया यांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी बाबू ऊर्फ मारु ती काळूराम घारे-मार्केवाडी तसेच धुळेवाडी येथील सुनील मारुती
धुळे, मारु ती भागा धुळे, काळूराम भरत धुळे, कृष्णा भागा धुळे, मंगेश काळूराम धुळे, ताराबाई मारु ती धुळे, कल्पना गोपाळ धुळे, सुशीला बळीराम धुळे, हिरा कृष्णा धुळे, पूजा शिवाजी धुळे आणि अर्चना गोपाळ धुळे अशा १४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.