शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई

By राजेश भोस्तेकर | Published: October 11, 2023 7:23 PM

१४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे.

अलिबाग : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामांचे कार्यारंभ आदेश मिळून एक वर्षाचा कालावधी उलटून काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली आहे. यापुढेही कामात दिरंगाई तसेच योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात गावागावात पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या योजना, प्रगतीपथावर असलेल्या योजना, घरोघरी नळ जोडणी यांचा तालुकानिहाय आढावा अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेतला होता.

पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतल्यानंतर आत्ता जिल्हा प्रशासनाने कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटला तरीही योजनेचे काम सुरू ना करणाऱ्या २६ योजनांचा ठेका रद्द करीत, १४ ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील १५ योजना असून, कर्जत ३, महाड १, अलिबाग २, उरण ३, मुरुड २ योजनांचा समावेश आहे. या २६ योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा निवीदा प्रक्रिया राबविली आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.  जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कारवाईतालुका : योजना : ठेकेदार

  1. पनवेल : आरीवली : पूजा कंट्रक्शन
  2. पनवेल : महालुंगी : पूजा कंट्रक्शन
  3. पनवेल : साई : पूजा कंट्रक्शन
  4. पनवेल : चेरवली : पूजा कंट्रक्शन
  5. पनवेल : बारापाडा : बेब कंट्रक्शन
  6. पनवेल : बोर्ले : एस. एन. कंट्रक्शन
  7. पनवेल : हरिग्राम : पूजा कंट्रक्शन
  8. पनवेल : पळस्पे : विवेक पाटील
  9. पनवेल : कसळखंड : राकेश राजू मगर
  10. पनवेल : केवाळे : पूजा कंट्रक्शन
  11. पनवेल : रिटघर : निखील कंट्रक्शन 
  12. पनवेल : आजीवली : राकेश राजू मगर
  13. पनवेल : बारवई : आकाश दशरथ मोरे
  14. पनवेल : कासप: निखील कंट्रक्शन
  15. पनवेल : कशेडे खुर्द : निखील कंट्रक्शन
  16. कर्जत : डोणे : समीर राम लोंगले
  17. कर्जत : तिवरे : मनस्वी कंट्रक्शन
  18. कर्जत : जांभवली : समीर राम लोंगले
  19. महाड : गव्हाडी : गजराई कंट्रक्शन
  20. अलिबाग : तलवडे : हितेश प्रभाकर ठाकूर
  21. अलिबाग : देवघर : श्री एंटरप्रायजेस
  22. उरण : नवघर : गायकर कंट्रक्शन
  23. उरण : कळवुसरे : रोहन राजेश टेमकर
  24. उरण : जसखार : रोहन राजेश टेमकर
  25. मुरुड : तळवली : रोहन राजेश टेमकर
  26. मुरुड : मोरे : राकेश राजू मगर
टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलिबाग