- वैभव गायकरपनवेल : अनलॉकनंतर पर्यटन क्षेत्र सुरू करण्यात आली आहेत. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यही तब्बल आठ महिन्यांनंतर शनिवारपासून सुरू झाले. मात्र रविवारी प्रथमच कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी झालेली दिसून आली. १,४६९ पर्यटकांमुळे अभयारण्य हाउसफुल्ल झाले होते.कर्नाळा अभयारण्य हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबईकरांसाठी खूप सोईचे ठिकाण असल्याने मुंबई उपनगरातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका निसर्गवाटा पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ. येथे अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत. या ठिकाणी दोन युवकगृह उभारली आहेत. या ठिकाणी १६ जण एकाच वेळेला थांबू शकतात. परिसरात फोटोग्राफी करण्यासाठी १०० रुपयांची फी आकारली जाते . याव्यतिरिक्त प्रवेश फी ३०, पार्किंग फी २५ ते १०० रुपये आकारली जाते.नियमावली मास्क, सॅनिटायझर सोबत बाळगणे सक्तीचे.गरोदर महिला, ६५ वरील ज्येष्ठ नागरिक, १० वर्षां खालील मुलांना प्रवेश बंद. सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी. पर्यटकांना अभयारण्यात योग, व्यायाम कारण्यास मनाई अभयारण्य परिसरात पाण्याच्या साठ्यानजीक थांबण्यास तसेच पाण्यात उतरण्यास बंदी
कर्नाळा अभयारण्याला दिली १,४६९ पर्यटकांनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 1:08 AM