अलिबाग : महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण देशभरात सोमवारी स्वच्छता अभियान राबवले. अलिबागमध्ये तीन हजार ३१३ श्रीसदस्य या अभियानामध्ये सहभागी झाले होते. ८५ टेम्पो, नऊ डंपरच्या साहाय्याने शहरातून १४८ टन कचरा गोळा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, जिल्हा न्यायालय यासह अन्य सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य होते.महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पत्र लिहिले होते. स्वच्छ भारत अभियान मोहिमेमध्ये मार्गदर्शन करण्याची विनंती मोदी यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केली होती. त्यानुसार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये अलिबाग शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रु ग्णालय, जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रांत कार्यालय, वन विभाग, धर्मादाय आयुक्त, जिल्हा कोषागार कार्यालय, एसटी स्टँड आदी ठिकाणचे व संपूर्ण समुद्रकिनारा त्याचबरोबर अलिबाग शहरातील सर्व रस्ते स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ३३१३ श्रीसदस्य सहभागी झाले. तसेच प्रतिष्ठानतर्फे या अभियानासाठी हॅन्डग्लोज, मास्क व झाडू पुरविण्यात आले. अभियानामध्ये संपूर्ण अलिबाग शहरातून १४८ टन कचरा गोळा केला.सरकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाºयांनी प्रतिष्ठानच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. सकाळी सात वाजल्यापासून शिस्तबद्ध पद्धतीने तसेच अचूक नियोजन करून शहरामध्ये स्वच्छता अभियान पार पाडले. याबाबत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी तसेच प्रतिष्ठानच्या कार्याची धुरा वाहणारे उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांनी स्वच्छता अभियान पार पाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व व्यवस्थापन केले.निकम शाळेत स्वच्छता अभियानमाणगाव : महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त २आॅक्टोबर रोजी माणगाव एस. एस. निकम इंग्लिश शाळेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्र म राबविण्यात आला.निकम इंग्लिश शाळेचे मुख्याध्यापक सतिश बडगुजर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला सुरु वातीला पुपष्हार अर्पण करु नअभिवादन करण्यात आले.यानंतर सकाळी ८.३०वाजाता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षककेतर कर्मचारी वृंद यांनी एकत्रितपणे स्वच्छतेला सुरु वात केली. यावेळी शाळेच्या ३६ खोल्या, मैदान, संपूर्ण परीसर, सर्व प्रयोगशाळा, कार्यालय, स्टाफ रु म आदि ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. या स्वच्छता अभियानात शाळेतील ३०० विद्यार्थी ६० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.दांड-रसायनी रस्ता चकाचकमोहोपाडा : महात्मा गांधीजयंती निमित्त देशभरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी रसायनी परीसरातील श्री समर्थ दासभक्तांनी रसायनी पोलीस ठाण्यापासून रिस थांब्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजेने साफसफाई करून रस्ता चकाचक केला.रसायनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिक बाटल्यांसह कचरा रस्त्याकडेला विखुरलेला होता. तो साफ करण्यासाठी परिसरातील श्री सदस्यांनी सकाळी ७ वाजता हजर राहून स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी श्रीसदस्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टीची स्वच्छता केली. यावेळी जमा केलेला कचरा मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ट्रालीतून, डंपरमधुन, जेसीबीने उचलून डंपिंग ग्राऊंडपर्यंत नेवून योग्य विल्हेवाट लावली.कर्जत तालुक्यात दोन टन कचरा संकलित१नेरळ /कर्जत: सोमवारी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी श्रीसदस्यांच्या वतीने स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता अभियानांतर्गत कर्जत तालुक्यात सुमारे दोनशे टन कचरा संकलित करून विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी कर्जत तालुक्यातील सुमारे ८ हजार श्रीसदस्यांनी या स्वछता मोहिमेत श्रमदान केले.२सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून या स्वछता अभियानाला सुरु वात करण्यात आली. या वेळी कर्जत तालुक्यातील कर्जत, कशेळे , पोशीर, नेरळ, कळंब, खांडस, चिंचवली, जुम्मापट्टी, दस्तुरी, माथेरान, डिकसळ, सर्व सरकारी कार्यालये, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत ही रेल्वे स्थानके चकाचक करण्यात आली. तसेच कर्जत कल्याण राज्य मार्गावरील शेलू ते डिकसळ परिसरही स्वच्छ करण्यात आला. अशा अनेक ठिकाणी श्रीसदस्यांनी झाडू, घमेली, फावडे घेऊन मुख्य रस्ते, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर व अन्य ठिकाणातील सरकारी कार्यालय परिसराची स्वछता केली. या वेळी परिसरात जमा झालेला सर्व कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्य्यने उचलून गावाबाहेरील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला.३या स्वछता अभियानात कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सुमारे आठ हजार श्रीसदस्यांनी या स्वछता अभियानात श्रमदान केले व सुमारे २०० टन कचरा संकलित करून कचºयाची विल्हेवाट लावली.
अलिबागमध्ये १४८ टन कचरा गोळा, तीन हजार ३१३ श्रीसदस्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 1:57 AM