१,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:06 AM2020-02-22T01:06:23+5:302020-02-22T01:06:49+5:30

महाडमध्ये १ कोटी ७५ लाख रुपये वाटप : ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

1,5 farmers waiting to be compensated | १,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

१,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

Next

दासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागा कडून करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. तालुक्यातील ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित राहिले आहेत. आतापर्यंत जवळपास १ कोटी ७५ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत जाहीर झाली आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रति हेक्टर ८ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये ८ हजार ५८६ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून २ कोटी २८ लाख १७ हजार १८२ रुपये नुकसानभरपाई दाखल झाली. तालुक्यांमध्ये सुमारे ८ हजार ५८६ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती महाड तालुका कृषी विभागाने दिली आहे. तालुक्यांतील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले.
सुरुवातीच्या अवेळी पावसामध्येही शेतकºयांचे नुकसान झाले होते. यातील अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. महाड तालुक्यातील जवळपास १ हजार ५६१ शेतकरी वंचित असल्याची माहिती महाड महसूल विभागाने दिली आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना ५३ लाख ४ हजार ४९० रुपये येणे अपेक्षित आहे.

१महाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभागातर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. २ हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले असले तरी सुमारे ८ हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. यापैकी ७०२५ शेतकºयांना १ कोटी ७५ लाख १२ हजार ६९३ रुपये वाटप झाले आहे.
२महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगर उतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहेत. तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडून उतविण्यांत आला आहे. मात्र ज्यांना नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे त्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही.
 

Web Title: 1,5 farmers waiting to be compensated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी