शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

15 टक्के रुग्ण 18 वर्षांखालील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:59 PM

रायगडमधील स्थिती; वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नाराजी 

- निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १५ टक्के रुग्ण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांना वेळेत लस मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. तर ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी असून त्यांना लसीकरणासाठी १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ४० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.मंगळवारपर्यंत १ लाख ९५ हजार ८८३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती हीच राहिली तर सर्वांना लस मिळण्यासाठी जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. यामुळे सर्वांना गतीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांना होत आहे. परंतु त्यांना अद्याप लस दिली जात नाही. एकूण रुग्णांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले १५ टक्के रुग्ण आहेत. पण, या वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.शहरातील तब्बल ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या वयोगटातील नागरिकांना १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ५० टक्के रुग्ण असून त्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु त्या सर्वांनाही वेळेत लस मिळत नाही. पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे वारंवार लसीकरण थांबवावे लागत आहे. नियमित व सर्व वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील तब्बल ७० हजार रुग्ण जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील रुग्ण आहेत. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल सत्तर हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी नेहमी बाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस पुरवितानाच दमछाक होत असून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पुरेसी लस मिळणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.१८ वर्षांखालील ५ हजार रुग्णरायगड जिल्ह्यामध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांच्या आतमधील तब्बल पाच हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्याचा रेषो पाहता मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त असले तरी या वयात गंभीर आजार झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यातही त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुलांनाही लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी लागणारnरायगड जिल्ह्यातील १८ वर्षांवरील मुलांना लस देण्यासाठीची कार्यवाही १ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.nमुलांना काम नसेल तर घराबाहेर जाण्यास मंजुरी देऊ नये. त्यांचा आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मुले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या