द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदामातील १५० कामगारांवर बेरोजगारीचे सकंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 03:49 PM2023-11-28T15:49:27+5:302023-11-28T15:51:46+5:30
संतप्त कामगारांचा स्थानिक कामगार नेत्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याचा निर्धार.
उरण : येथील द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम व्यवस्थापक विरोधातील कामगारांच्या आंदोलनामुळे कंपनीने कामकाज बंद करून गाशा गुंडाळल्याचा निर्णय घेतला आहे.या कंपनीच्या या टोकाच्या निर्णयामुळे सध्या कंपनीत काम करीत असलेल्या सुमारे १५० स्थानिक भुमीपुत्र कामगारांव उपासमारीचे सकंट येणार आहे.कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या कामगार नेते, पुढाऱ्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम आहे.या गोदामातून कंटेनर मालाची हाताळणी केली जात आहे.मात्र कंटेनर मालाच्या हाताळणीचे काम कमी झाल्याने २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले आणि ३७३ कामगार काम करीत असलेले द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम ९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते.त्यामुळे ३७३ कामगार देशोधडीला लागले होते.
त्यानंतर नऊ वर्षांच्या कालावधीनंतर द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम खासगी बजेट सीएफएस कंपनीने १५ वर्षांच्या करारावर चालविण्यासाठी घेतले आहे. या बजेट सीएफएसने जुन्या अनुभवी आणि पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे १५० स्थानिक भुमीपुत्र कामगारांना कामावर घेतले आहे.फेबु्वारी २०२३ रोजी सुरू झालेल्या बजेसीएफएस कंपनीनेस्थानिक भुमीपुत्र कामगारांना वेळेत वेतन आणि बोनसही अदा करुन व्यवसाय आणखी वाढल्यास कामगारांना आणखी काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आश्वासन दिले आहे.बजेट सीएफएस कंपनीचे वर्षभरात कंटेनर मालाची हाताळणी करण्याचे काम सुरळीत सुरू असताना जुन्या ३७३ कामगारांपैकी काम न मिळालेल्या काही कामगारांनी स्थानिक कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कामावर घेण्यासाठी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
२० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या आलेल्या उपोषणामुळे बजेट सीएफएस कंपनी व्यवस्थापनाने भविष्यात व्यवसायात वाढ झाल्यास कामगार भरतीचा नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन उपोषणकर्त्याने दिले होते. त्यानंतर तहसीलदार, पोलिस प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्याशी झालेल्या बैठकीतही कंपनी व्यवस्थापनाने व्यवसाय वृध्दी नंतरच कामगार भरती बाबत विचार करण्याची तयारी दाखवली होती.मात्र उपोषणकर्त्याचा संघर्षाचा पवित्रा कायम राहिल्याने कंपनी व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने उपोषणाला स्थगित दिली आहे.
मात्र उपोषणकर्त्यामुळे कंपनी व्यवस्थापन कंपनीचं बंद करण्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या कंपनीत काम करणाऱ्या १५० कामगारांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची भीती कामगार अरुण पाटील यांनी व्यक्त केली आहे.कुटुंबियांवर येणाऱ्या उपासमारीच्या सकंटाची चाहूल लागताच सध्या काम करीत असलेल्या संतप्त कामगारांनी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या कामगार नेते, पुढाऱ्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार अरुण पाटील यांनी यांनी दिली.यामुळे खळबळ माजली आहे.
नऊ वर्षांपूर्वी बंद पडलेले द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील १५० स्थानिक भुमीपुत्रांची कामगार भरती करण्यात आली आहे.भविष्यात वाढत्या व्यवसायामुळे गरज भासल्यास पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक कामगारांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल.मात्र व्यवसाय कमी झाल्यास कंपनीचं बंद करावी लागेल.तसेच न्यायालयानेच उपोषण बेकायदेशीर ठरविले आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया बजेट सीएफएस कंपनीचे रिजनल मॅनेजर निखिल भंडारी यांनी दिली.