अलिबाग - जिल्ह्यातील १५० सार्वजनिक, तर १७,०१६ घरगुती गणरायाचे अनंत चतुर्दशीला विविध ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन सोहळा सुव्यवस्थित पार पडावा, याकरिता जिल्ह्यातील सर्वच विसर्जन घाटांवर, तसेच मिरवणूक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस सूत्रांनी दिली आहे.जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्था विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ६७० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच एसआरपीएफ, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, होमगार्ड व मुंबईचे रेल्वे पोलीस आदी सुरक्षा यंत्रणांमार्फ त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आठ उपविभागीय पोलीस अधिकारी, २८ पोलीस निरीक्षक, ३६ सहायक पोलीस निरीक्षक, ५८ पोलीस उपनिरीक्षक, ५४० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफचे चार प्लाटून, आरसीपीचे चार प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्सचे पाच प्लाटून, ४० रेल्वे पोलीस, १८१ महिला व पुरु ष होमगार्ड आदीचा यात समावेश आहे.महाडमध्ये सर्वाधिक विसर्जन मिरवणुकामहाड शहरात जिल्ह्यातील सर्वाधिक १७ सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका आहेत. उर्वरित ठिकाणी खोपोली-१५, कर्जत-१२, माणगांव-१०, नागोठणे, पाली व कोलाड प्रत्येकी-९, पेण व पोयनाड प्रत्येकी-८, अलिबाग, रसायनी व गोरेगांव प्रत्येकी-७, बिरवाडी-६, रोहा-५, खालापूर व श्रीवर्धन प्रत्येकी-४, महाड तालुका-३, पोलादपूर, दादर सागरी व रेवदांडा प्रत्येकी-२, नेरळ, मांडवा, दिघी व माथेरान येथे प्रत्येकी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक आहे.पनवेल पालिका प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्जपनवेल : अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातो. या दिवशी पनवेल तालुक्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महापालिका प्रशासनही विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज असून, सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ८३१ सार्वजनिक, तर ८२ हजार ८४४ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती, यातील दीड, अडीच, पाच, सहा व सात दिवसांच्या ४२२ सावर्र्जनिक व ६१,१२४ गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले आहे. अनंत चतुर्दशीला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४०९ सार्वजनिक व २१,७२० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या विसर्जन सोहळ्यावर ५७३ सीसीटीव्हींचा वॉच राहणार आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोळीवाडा, बल्लाळेश्वर तलाव, नवीन पनवेल व खांदेश्वर, आदई तलाव, खारघर सेक्टर १५, ४ तसेच मुर्बी विसर्जन घाट आदीचा समावेश आहे. तळोजा, कामोठे, खांदा गाव या ठिकाणी शहरातील विविध तलावांत विसर्जन केले जाते. ग्रामीण भागातही नदी व गावातील तलावात, विसर्जन घाटावर विसर्जन केले जात असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.ध्वनितीव्रता मापक यंत्रेमुंबई उच्च न्यायालयाने अति आवाजांच्या डीजे सिस्टीमवर बंदी कायम केली असल्याने, विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविता येणार नाहीत.याबाबत पोलिसांनी स्थानिक पातळीवर सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर गस्ती पथकांकडे ध्वनितीव्रता मापक यंत्रे देण्यात आली आहेत.डीजे सिस्टीम वाजवल्याचे निष्पन्न झाल्यास ते तत्काळ जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पर्यावरणाचा समतोल आबाधित राखण्यासाठी अलिबागसह सर्वत्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.नगरपालिकेची विशेष व्यवस्थाअलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात सार्वजनिक व १२५० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.अलिबाग समुद्रकिनारी विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अलिबाग नगरपालिकेतर्फे३० कर्मचाºयांची फौज नियुक्त केली आहे. विसर्जन स्थळावर स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. ५० जीवरक्षक, मोटारबोट, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिकांची सुविधा पुरविण्यात आली आहे.अलिबाग पोलिसांमार्फत समुद्रकिनारी मदत केंद्र उभारण्यात आले आहे. समुद्रकिनारी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विसर्जनाच्या वेळी संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेºयांची मदत होणार आहे.अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर तसेच अलिबाग समुद्रकिनारी विशेष विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात बंदोबस्तासाठी एकूण १७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, आरएसपी विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विसर्जनप्रसंगी पोहता येणाºया व्यक्तीनेच पाण्यात जावे, अशी सूचना विसर्जनस्थळी स्थानिक पातळीवर स्पीकर्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी केली उरण परिसराची पाहणीउरण : अनंत चतुर्थीच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आयुक्त संजय कुमार यांनी उरण परिसरातील नागरी किनाºयासह विसर्जनाच्या विविध ठिकाणांची शनिवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकाºयांना विसर्जनाच्या निमित्ताने चोख बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था ठरवण्याच्याही सूचना केल्या. आयुक्तांच्या सूचनेनंतर गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येपासूनच पोलीस आणि तालुका प्रशासन कामाला लागले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.दहा दिवसांच्या अर्थात अनंत चतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन रविवारी होणार आहे. उरण तालुक्यात विशेषत: विविध ठिकाणच्या तलाव, खाड्या आणि समुद्रकिनाºयावर श्रीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. प्रामुख्याने उरण परिसरातील आणि मोरा सागरी पोलीस ठाणे, उरण पोलीस ठाणे आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घारापुरी, पीरवाडी, माणकेश्वर, मोरा, पाणजे, करंजा, वशेणी आदी समुद्रकिनारे आणि उरण शहरातील विमला तलाव, भवरा तलाव आणि परिसरातील विविध ठिकाणांच्या तलावात श्रीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.नवी मुंबई आयुक्त संजय कुमार यांनी उरण परिसरातील सागरी किनाºयांसह विसर्जनाच्या विविध ठिकाणांची पाहणी केली. आयुक्तांनी पोलीस अधिकाºयांना गणपती विसर्जन दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. या वेळी न्हावाशेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, वपोनि चेतन काकडे आदी उपस्थित होते.
गणेश विसर्जनाकरिता चोख बंदोबस्त, रायगड जिल्ह्यात आज १५० सार्वजनिक तर १७,०१६ घरगुती गणपती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 3:25 AM