मुसळधार पावसातही दोन दिवसांपासून जळणारे १५० वर्ष जुनं अजब चिंचेचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:49 AM2021-05-18T09:49:29+5:302021-05-18T09:49:53+5:30
मात्र खालपासून वरपर्यंत पुर्णपणे पोखरले आहे.आग विझविण्यात आल्यानंतरही आग आतील भागात तशीच राहातं असल्यानेच आग आटोक्यात येत नाही.
मधुकर ठाकूर
उरण : तालुक्यातील केगाव -डोंगर आळीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका १५० वर्षांच्या चिंचेच्या झाडाला सोमवारी तीनवेळा आग लागली.तीन्ही वेळा सिडकोचे अग्निशमन दलाचे जवान आणि मोरा सागरी ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणली .मात्र मंगळवारी मध्यरात्री चिंचेच्या झाडाने पुन्हा एकदा खालपासून वरपर्यंत पेट घेतला आहे.पुन्हा एकदा अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे .आगीचे नेमकं कारण अद्यापही समोर आले नाही.
मात्र खालपासून वरपर्यंत पुर्णपणे पोखरले आहे.आग विझविण्यात आल्यानंतरही आग आतील भागात तशीच राहातं असल्यानेच आग आटोक्यात येत नाही.मात्र चिंचेचे झाड मुसळधार पावसातही वारंवार पेटत असल्याने नागरिकही आश्चर्य चकित झाले आहेत.रस्त्याच्या कडेलाच असलेले आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागलेले झाड आता मुळासकट कापून काढण्याची तयारी सिडकोच्या अग्निशमन दलाने केली आहे.