पनवेल : लॉकडाउनमुळे नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओडिसा राज्यातील तब्बल १५ हजार १०४ मजूर विशेष रेल्वेने स्वगृही पाठविण्यात आले.आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता २, उत्तरप्रदेशकरिता २ तर बिहार आणि ओरिसाकरिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देशभरात लाखो मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. त्याचप्रमाणे रायगडमध्येही मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा येथील हजारो मजूर अडकले होते.रेल्वेत बसण्यापूवी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वगृही जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून पनवेल रेल्वेस्थानकात बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांना जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यातआले. रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाइझर करणे व स्थानकावर निर्जंतुकीकरण केले होते.गावी जायला मिळत असल्याने मजुरांच्या चेहºयावर समाधान होते, गावी जाण्याची, कुटुंबाला भेटण्याची ओढ होती. गाडी निघताना प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्थानकात उपस्थित प्रत्येकाचेटाळ्या वाजवून मन:पर्वूक आभारव्यक्त केले.२८६ कामगार उत्तरप्रदेशला रवानामोहोपाडा : चौक परिसरातून २८६ मजूर उत्तरप्रदेशसाठी रवाना झाले आहेत. मजुरांना सुरुवातीला १२ बसमधून पनवेलला पाठविण्यात आले, त्यानंतर रेल्वेने मूळ गावी रवाना करण्यात आले. गावी जाण्याची मुभा मिळाल्यावर, कामगारांनी कुटुंबासह गर्दी केली होती. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी यांनी शेकडो कामगारांना एकत्र केले. अर्ज भरून २८६ जणांना १२ एसटी बसमधून पनवेल रेल्वेस्थानकात सोडण्यात आले. या वेळी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तलाठी व ग्रामसेवकांनी स्वखर्चाने केली.
पनवेलमधून १५ हजार मजूर स्वगृही रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 6:28 AM