शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तोंडसुरेत दोन दिवसांत १६ गुरांचा मृत्यू

By admin | Published: March 30, 2017 6:52 AM

तालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १६ गुरे मृत्युमुखी पडल्याने परिसरात घबराट

उदय कळस / म्हसळातालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १६ गुरे मृत्युमुखी पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे; परंतु तालुका पशुधन अधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार हवामानातील होणाऱ्या बदलामुळे मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाच याचा त्रास होतो. त्यामुळे जनावरे सकाळी चरून आल्यावर गोठ्यात बांधून ठेवणे हाच उपाय असल्याचे सांगितले. तसेच उपाय सांगूनदेखील गावकरी हलगर्जी करुन जनावरांना मोकाट सोडत असल्याची खंत व्यक्त केली.गेल्या दोन दिवसांपासून तोंडसुरे व आजूबाजूच्या परिसरात गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले, त्यामुळे तब्बल १६ जनावरांचा मृत्यू झाला. गायी, बैल, वासरू यांचा यामध्ये समावेश होता. गुरांच्या या मृत्यूमुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर ग्रामस्थांनी तालुका पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क करून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे पुढील हालचाली करत, डॉ. पी. डी. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुरांच्या उपचारास सुरुवात केली. मात्र, आवश्यक असलेल्या औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने एकाच प्रकारचे इन्जेक्शन गुरांना देण्यात आले. हे उपचार केल्यानंतर डॉक्टर पुन्हा गावात येईपर्यंत गुरे मृत्युमुखी पडली असल्याचे, तोंडसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज नाक्ती यांनी सांगितले. अशा गुरांच्या मृत्यूमुळे बळीराजाचे आर्थिक नुकसान झाल्याने याची नुकसानभरपाई रायगड जिल्हापरिषदेकडून मिळावी, अशी मागणी तोंडसुरे सरपंच नाक्ती व ग्रामस्थांनी उपसभापती मधुकर गायकर यांची भेट घेऊन केली.शेतकऱ्यांना आवाहनआपली गुरे मोकाट सोडून जनावरांंवर संकट ओढवून घेऊ नका. गुरांना गोठ्यातच बांधून त्याचठिकाणी चारा व पाणी देऊन गुरांची निगा राखा. गुरांवर काही परिणाम जाणवत असेल तर ताबडतोब तालुका पशुधन आरोग्य अधिकाऱ्यांना कळविल्यास उपचार होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी वेळ न दवडता तालुका कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या पाळीव जनावरांना मृत्यूपासून वाचवा. या रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मिनरल मिक्स्चर दिले पाहिजे, यामुळे क्षार व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण संतुलित होऊन, गुरांना या रोगाचा प्रादूर्भाव होत नाही.- डॉ. एस.बी. शहा, पशुधन विकास अधिकारी, म्हसळातोंडसुरे येथील जनावरांची मृत्यू मालिका हा प्रकार गंभीर आहे. पशुवैद्यकीय पथक तोंडसुरे येथे पोहोचेल व दोन दिवसांत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग यांचे पथक रक्त नमुने घेण्यासाठी येणार आहे.- डॉ .आर.आर. लालगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.परिषद म्हसळा तालुका पशुवैद्यकीय विभागात पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती पशुधन पर्यवेक्षक, ड्रेसर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, पशुधन शिपाई, संदेरी अशी अनेक पदे रिक्त आहेत, याबाबत जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करणार.- मधुकर गायकर, उपसभापती, म्हसळा