शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

जेएसडब्ल्यूच्या बार्जवरून केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:25 AM

भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलीस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य

- अभय आपटे                                                                                                                                    लाेकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                        रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील खाडीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या एम.व्ही. मंगलम बार्जला अपघात झाला. हा मालवाहू बार्ज रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हि घटना घडली.  रायगड पाेलीस, तटरक्षक दलाने बचावकार्य मोहीम राबवत १६ खलाशांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही. मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार ४०० मेट्रिक टन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून निघाली हाेती. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधित कंपनीने दिली नाही. ओहाेटी सुरू झाल्याने गाळात रुतली. याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडेदहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची दाेन हेलिकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. १६ खलाशांना हेलिकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरुण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधीक्षक अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या खलाशांची झाली सुखरूप सुटकाकॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके.