उरणच्या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त, १६४२ गणपतींचे होणार विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:20 PM2023-09-27T19:20:43+5:302023-09-27T19:22:53+5:30
अधिकाऱ्यांसह १५८ कर्मचारी तैनात
मधुकर ठाकूर, उरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी तीनही पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह १५७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गुरुवारी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.यामध्ये उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -८००, सार्वजनिक -१२, सोसायटी -५ , मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -२६० तर न्हावा -शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -५६३, सार्वजनिक -१, सोसायटी -१ अशा एकूण १६४२ गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.
घारापुरी, मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा, माणकटोक, न्हावा-खाडी,उलवा, मोरबे आदी समुद्र- खाड्या किनारी आणि शहरातील विमला,भवरा तसेच तालुक्यातील विविध गावातील तलावात गणपतींचे विसर्जन केले जाते.
गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.उरण,मोरा सागरी पोलीस आणि न्हावा -शेवा पोलिस ठाणे मिळून एकूण १५७ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.यामध्ये पोलिस निरीक्षक-४ , एपीआय-१८, कर्मचारी -१३५ आदींचा समावेश आहे.
त्याशिवाय अतिरिक्त बंदोबस्तासाठी २० कर्मचाऱ्यांचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली फिरत्या मोबाईलचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.