लोकमत न्यूज नेटवर्करायगडः काेराेनाच्या विषाणूने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल १६८ रुग्णांचा गळा घाेटला आहे. पैकी एकट्या पनवेल महापालिकेत ६५ जण दगावले आहेत. दिवसाला १२००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे पडत असल्याचे दिसून येते.काेराेनाचा विषाणू सध्या जिल्ह्यावर प्रचंड वेगाने आघात करत आहे. आतापर्यंत ९६ हजार १२६ जणांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे, तर ८२ हजार ९२ जण काेराेना मुक्त झाले आहेत. दाेन हजार २७ रुग्ण काेराेनामुळे दगावले आहेत. सदरची आकडेवारी ही २२ एप्रिल २१ पर्यंतची आहे.काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र काेराेनाचा संसर्ग राेखण्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था पुरती ढेपाळली आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच फरफट हाेत आहे. सध्या १२ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पैकी तब्बल नऊ हजार १०१ रुग्णांवर घरातच उपचार केले जात आहेत. गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने पुढे सरकत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झाेप उडाली आहे.आराेग्य यंत्रणा सक्षम नसल्याने जिल्ह्यात रुग्णाबाबत हेळसांड हाेत आहे. हे काही आता लपून राहिलेले नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल १६८ रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दाेन लाख जणांचे लसीकरण पूर्णnकाेराेना विषाणूचा हाेणारा फैलाव राेखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला आहे, तसेच काेराेना लसीकरणही करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाेन लाख ११ हजार ५५५ जणांनी काेराेनाची लस टाेचून घेतली आहे.n लस घेणाऱ्यांमध्ये फ्रंटलाइन वर्करची संख्या २९ हजार २६६, तर आरोग्य सेवकांची संख्या २७ हजार ९१० आहे. ४५ ते ६० वयाेगटांतील ७४ हजार ८३८ नागरिकांचा समावेश आहे. ६० वर्षांच्या पुढे लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ७९ हजार ५४१ अशी आहे.