श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरातील पेशवे स्मारकासाठी राज्य सरकारने १८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्रीवर्धन नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली.अनेक वर्षांपासून पेशवे स्मारकाच्या नूतनीकरणाची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. स्मारकाची जागा नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या ताब्यात आहे. लक्ष्मी नारायण न्यासाकडून जागा मिळण्यात अडचण होती. नगर रचना खात्याकडून देण्यात येणाºया दरात वाढीची मागणी होती. नगरपालिकेने विकास आराखड्यामध्ये आरक्षण क्र. २४ ठेवले होते. मात्र, लक्ष्मी नारायण न्यासाकडे १८ गुंठे जागा होती. नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्या समन्वयातून पेशवे स्मारकाचे नूतनीकरण होणार आहे.श्रीवर्धन तालुक्यात येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १९८८मध्ये पेशवे स्मारकाची उभारणी केली होती. तत्कालीन विधान परिषद सभापती जयंत टिळक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बाळाजी पेशव्यांचा पूर्णाकृती पुतळा व चार खोल्यांचे सभागृह बांधले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणतेही नवीन काम या ठिकाणी करण्यात आले नाही.पेशवे स्मारकाच्या नूतनीकरणासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. आज या मागणीची पूर्ती झाली असून, त्यामुळेच निधी मंजूर करण्यात आला आहे.- मनोज गोगटे,सामाजिक कार्यकर्तापेशवे स्मारक निधीच्या मंजुरीचे संपूर्ण श्रेय सुनील तटकरे यांचे आहे. नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्यात योग्य संवाद घडवून सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच स्मारकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.- नरेंद्र भूसाने, नगराध्यक्ष,श्रीवर्धन नगरपालिका
पेशवे स्मारक नूतनीकरणासाठी १८ कोटींचा निधी; पर्यटकांचे खास आकर्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:21 AM