जिल्ह्यातील २८ पैकी १८ धरणे भरली
By admin | Published: July 14, 2016 02:08 AM2016-07-14T02:08:40+5:302016-07-14T02:08:40+5:30
धरण परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे बुधवारी सकाळी आठ
जयंत धुळप, अलिबाग
धरण परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे बुधवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. गतवर्षी २०१५ मध्ये याच दिवशी १४ धरणे भरली होती, तर त्या आधी २०१४ मध्ये या दिवशी एकही धरण १०० टक्के भरले नव्हते. दरम्यान, उर्वरित १० धरणांपैकी एक ७५ टक्क्यांपेक्षा अधिक, एक ५० ते ७५ टक्के, सहा धरणे २५ ते ५० टक्के तर दोन धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली आहेत. यामुळे येथील नागरिक समाधानी आहेत.
येत्या काही दिवसांत १० धरणे पूर्ण भरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी आणखी थोड्या पावसाची आवश्यक्ता आहे. रायगड जिल्ह्यात बुधवार, १३ जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत २१,९७२.१० मि.मी. इतका पाऊस पडला असून, त्याची सरासरी १,३७३.२६ मि.मी. आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७२ मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी माणगांव ५४ मि.मी., महाड ५२ मि.मी., सुधागड पाली ४६ मि.मी., पोलादपूर ४२ ,तळा ३९, खालापूर ३४, कर्जत ३३.७०, पनवेल २८, म्हसळा २६.४०, पेण २२, रोहा २०, श्रीवर्धन १८, मुरु ड १५, अलिबाग ७ तर उरण ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.