गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:42 PM2018-08-07T17:42:31+5:302018-08-07T17:46:36+5:30

गावठी दारुनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगाच्या मुळावरच घाव घालण्याचा हेतूने या गावठी दारु निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली.

18 people arrested with merchants in case of providing Navsagar and jute for hawk drunk in alibaug | गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक

गावठी दारुसाठी नवसागर अन् गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांसह 18 जणांना अटक

जयंत धुळप

अलिबाग : गावठी दारुनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगाच्या मुळावरच घाव घालण्याचा हेतूने या गावठी दारु निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या करावाईत गावठी दारूकरिता नवसागर, गुळ पुरविणाऱ्या व्यापाऱ्यासह एकुण 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, 18 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या 18 आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे.ए.शेख यांनी दिली आहे. 

गावठी दारुच्या निर्मितीची संपूर्ण चेन गजाआड

बेकायदा गावठी व हातभट्टीच्या दारुच्या अनुषंगाने अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरुड आदि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारू विक्री करणाऱ्या एकूण सात आरोपींनी रंगेहात पकडून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीअंती त्याना गावठी दारू पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक करण्यात यश आले. गावठी दारू पुरवठा करणाऱ्यांना बोलते केल्यावर त्यांच्याकडून गावठी दारू तयार करणाऱ्यांची माहिती मिळताच, दारु तयार करणाऱ्या चौघांना रंगेहात अटक करण्यात आली. गावठी दारू तयार करणाऱ्या या चौघांना गुळ, नवसागर व मीठ विकणाऱ्या तीन बडय़ा व्यापाऱ्यांना रोहा आणि ठाणो जिल्ह्यातील उल्हासनगर येथून अटक करण्यात आली. या कारवाईत 1575 लिटर गावठी हातभट्टी दारूसह 9008 किलो गुळ, 2040 किलो नवसागर जप्त करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाई प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम 328 सह महाराष्ट्र मद्यनिषीद्ध अधिनियम कलम 65(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गावठी दारुची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन

पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांचे आदेशाप्रमाणो अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि जे.ए.शेख, सपोनि सचिन सस्ते, सापोनि दिलीप पवार, पोऊनि अमोल वळसंग, सफौ आर.बी.बिडकर, पोह ए.जे.बिर्जे, चापोह एन.आर.कोरम, पोह आर.बी.दबडे यांनी ही धडाकेबाज मोहिम यशस्वी केली आहे. जिल्ह्यात गावठी दारू प्रतिबंधात्मक कारवाई निरंतर सुरु राहणार आहे. नागरिकांना गावठी दारू विक्रीसाठा, वाहतूक याबाबत माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.

Web Title: 18 people arrested with merchants in case of providing Navsagar and jute for hawk drunk in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.