नवसागर, गूळ पुरविणाऱ्या व्यापा-यासह १८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:13 AM2018-08-08T03:13:35+5:302018-08-08T03:13:39+5:30

गावठी दारूनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगावरच घाव घालण्याच्या हेतूने या गावठी दारू निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थांचा पुरवठा करणा-या व्यापा-यावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.

18 people including Neusagar, juggling merchandise arrested | नवसागर, गूळ पुरविणाऱ्या व्यापा-यासह १८ जणांना अटक

नवसागर, गूळ पुरविणाऱ्या व्यापा-यासह १८ जणांना अटक

googlenewsNext

- जयंत धुळप 
अलिबाग : गावठी दारूनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगावरच घाव घालण्याच्या हेतूने या गावठी दारू निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थांचा पुरवठा करणा-या व्यापा-यावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.
गावठी दारू समुळ नष्ट करण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेल्या आदेशान्वये, जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडक कारवाईत गावठी दारूकरिता नवसागर, गूळ पुरविणाºया व्यापाºयासह एकूण १८ जणांना अटक केली. कारवाईत १८ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे. अटक करण्यात आलेल्या १८ आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए. शेख यांनी दिली आहे.
बेकायदा गावठी व हातभट्टीच्या दारूच्या अनुषंगाने अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरु ड आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारू विक्र ी करणाºया एकूण सात आरोपींना रंगेहाथ पकडून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनंतर गावठी दारू पुरवठा करणाºया तिघांना अटक करण्यात यश आले. गावठी दारू पुरवठा करणाºयांना बोलते केल्यावर त्यांच्याकडून गावठी दारू तयार करणाºयांची माहिती मिळताच, दारू तयार करणाºया चौघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. गावठी दारू तयार करणाºया चौघांना गूळ, नवसागर व मीठ विकणाºया तिघा बड्या व्यापाºयांना रोहा आणि उल्हासनगर येथून अटक करण्यात आली.
९०८० किलो गूळ, २४०० किलो नवसागर जप्त
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३२८ सह महाराष्ट्र मद्यनिषिद्ध अधिनियम कलम ६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांत एक पिकअप व्हॅन, दोन कार, दोन मोटारसायकल,१ हजार ५७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू,९ हजार ८० किलो गूळ, २ हजार ४०० किलो नवसागर, २५० किलो मीठ असा एकूण १८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गावठी दारूची माहिती देण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि जे.ए.शेख, सपोनि सचिन सस्ते, सपोनि दिलीप पवार,पोऊनि अमोल वळसंग, सफौ आर.बी.बिडकर, पोह ए.जे. बिर्जे, चापोह एन.आर.कोरम, पोह आर.बी.दबडे यांनी ही धडाकेबाज मोहीम यशस्वी केली आहे. जिल्ह्यात गावठी दारू प्रतिबंधात्मक कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. नागरिकांना गावठी दारू विक्र ी,साठा, वाहतूक याबाबत माहिती मिळताच तत्काळ नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी, असे आवाहन पारसकर यांनी केले आहे.

Web Title: 18 people including Neusagar, juggling merchandise arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.