शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सुधागडातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांना टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:11 AM

सुधागडातील जिल्हा परिषदच्या एकूण १५४ शाळांपैकी २०१६ ते २०१८ पर्यंत १८ शाळांना टाळे लागले आहेत. ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.

पाली : सुधागडातील जिल्हा परिषदच्या एकूण १५४ शाळांपैकी २०१६ ते २०१८ पर्यंत १८ शाळांना टाळे लागले आहेत. ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.बंद असलेल्या शाळांमध्ये तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, विडसई, मुळशी, वेळकरपाडा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेणवली यांचा समावेश आहे. यातील ९ ते १० शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत.तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा असल्याने पालकांची मानसिकता मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने खासगी शाळेत पाठवले जात आहे. त्याचबरोबर शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने खेड्यातील पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच आदिवासीचे स्थलांतर होणे थांबले नाही व खेड्यापाड्यातील नागरिकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शाळेत शासनाच्या नियमानुसार पटसंख्या कमी असल्याने या १८ शाळांना टाळे लागले आहे. डोंगराळ भागात असणाऱ्या शाळा बंद झाल्याने मुलांना शिक्षणाविना राहावे लागत आहे.शासन शिक्षणावर विविध योजना आखत असले तरी आजवर ग्रामीण भागातील गावांमध्ये खेडोपाड्यात शिक्षण व्यवस्था बिकट झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षण व्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन खर्च करत आहे; परंतु खासगीकरणामुळे आदिवासी गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना शाळा बंद झाल्याने सुविधा नसल्याने नाइलाज म्हणून खासगी शाळेत पाठवावे लागत आहे. तेथील शाळेत भरमसाठ आकारलेली फी भरावी लागत आहे. मग शासन निधी आमच्या काय कामाचा, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या २० असली पाहिजे, त्यापेक्षा कमी असल्यास शाळा बंद करण्याचे आदेश आहेत, यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद झाल्या आहेत.- शिल्पा पवार, गटशिक्षण अधिकारी, सुधागड-पालीसर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिकावे, याकरिता शासनाने अनेक सोयीसुविधा दिल्या असून या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा परिषद शाळा अपयशी ठरल्याने खासगी शाळेचे फावले आहे. यात बदल घडल्यास जिल्हा परिषद शाळेचा पट वाढू शकतो.- प्रमोद उतेकर, पालकसुशिक्षितांना रोजगार मिळाल्यास व आदिवासींचे स्थलांतर थांबल्यास खेडोपाड्यातील शाळांची पटसंख्या वाढू शकते. त्याचबरोबर वेळापत्रकाशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिल्यास खासगी शाळेमध्ये प्रवेश घेण्याची संख्या कमी होऊ शकते.- आरती भातखंडे, ग्रामस्थ, पाली

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRaigadरायगड