६४ जागांसाठी १८१ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 19, 2015 01:20 AM2015-10-19T01:20:55+5:302015-10-19T01:20:55+5:30
उरणच्या सहा ग्रामपंचायतीच्या ६४ जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे १८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उरण तालुक्यातील केगाव, म्हातवली, नागाव, फुंडे,
उरण : उरणच्या सहा ग्रामपंचायतीच्या ६४ जागांसाठी विविध राजकीय पक्षांचे १८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उरण तालुक्यातील केगाव, म्हातवली, नागाव, फुंडे, वेश्वी आदी सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका २८ आॅक्टोबरला होणार आहेत. यामध्ये हनुमान, कोळीवाडा ग्रामपंचायतींच्या २ पोटनिवडणुकींच्या जागांचाही समावेश आहे. केगाव ग्रामपंचायतीच्या ५ प्रभागातील १३ जागांसाठी ३६, नागाव ४ प्रभागातील ११ जागांसाठी ३३, म्हातवली ४ प्रभाग ११ जागांसाठी २३, फुंडे ३ प्रभाग ९ जागांसाठी ३१ चाणजे ६ प्रभाग १७ जागांसाठी ५२ आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ आणि प्रभाग ३ मधील सहा जागांसाठी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. प्रभाग २ मधून अजित पाटील, विलास पाटील, निशा पाटील तर प्रभाग ३ मधून शुभांगी मुंबईकर, सुजाता पाटील, नरेंद्र मुंबईकर हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २४६ उमेदवारांपैकी ५८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले ओहत.