१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 11:32 AM2023-06-21T11:32:43+5:302023-06-21T11:33:00+5:30

वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

18.64 lakh bamboo and sevgya plants will be planted, the district will blossom with green forests | १८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख ६४ हजार २५२ बांबू व शेवगा जातीची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.

वृक्षलागवड मोहीम सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, नदी किनाऱ्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे, शेवग्याची रोपे नागरिकांनी आपल्या परसबागेत लावावीत आशा सूचना आहोत.

लागवड स्पर्धा
वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
संवर्धनासाठी शपथ
वृक्षलागवड कार्यक्रम 
यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, 
स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक 
स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसाहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवकांचा लोकसहभाग घ्यावा, वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खड्डे खोदणे, सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मागणीप्रमाणे रोपे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करावी, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दत्तक रोपे वृक्षलागवड यादी, फोटोसह सादर कराव्यात
- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद

Web Title: 18.64 lakh bamboo and sevgya plants will be planted, the district will blossom with green forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड