चोवीस तासांत १८९६ मिमी पाऊस

By admin | Published: July 30, 2016 04:28 AM2016-07-30T04:28:36+5:302016-07-30T04:28:36+5:30

गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात पावसाने मुसळधार बरसून सरासरी एक हजार ८९६ मिलीमीटर उच्चांकी नोंद केली. हाच आकडा गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी

1896 mm rain in 24 hours | चोवीस तासांत १८९६ मिमी पाऊस

चोवीस तासांत १८९६ मिमी पाऊस

Next

अलिबाग : गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात पावसाने मुसळधार बरसून सरासरी एक हजार ८९६ मिलीमीटर उच्चांकी नोंद केली. हाच आकडा गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी स्पर्धा करताना ५७४ मिलीमीटरने जास्त असल्याचे दिसून आले. सर्वच तालुक्यात हजार मिलीमीटरचा टप्पा पार केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुरुड तालुक्यात सर्वाधिक दोन हजार ४९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल रोहे दोन हजार ३२६ मिलीमीटर, तळा दोन हजार ३०८ मिलीमीटर, श्रीवर्धन दोन हजार २८९ मिलीमीटर, म्हसळा दोन हजार २२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित तालुक्यांमध्येही एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी (२०१५) याच दिवशी सरासरी एक हजार ३२२ मिलीमीटर पाऊस पडला होता. (प्रतिनिधी)

Web Title: 1896 mm rain in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.