अलिबाग : गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात पावसाने मुसळधार बरसून सरासरी एक हजार ८९६ मिलीमीटर उच्चांकी नोंद केली. हाच आकडा गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी स्पर्धा करताना ५७४ मिलीमीटरने जास्त असल्याचे दिसून आले. सर्वच तालुक्यात हजार मिलीमीटरचा टप्पा पार केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.मुरुड तालुक्यात सर्वाधिक दोन हजार ४९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल रोहे दोन हजार ३२६ मिलीमीटर, तळा दोन हजार ३०८ मिलीमीटर, श्रीवर्धन दोन हजार २८९ मिलीमीटर, म्हसळा दोन हजार २२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित तालुक्यांमध्येही एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी (२०१५) याच दिवशी सरासरी एक हजार ३२२ मिलीमीटर पाऊस पडला होता. (प्रतिनिधी)
चोवीस तासांत १८९६ मिमी पाऊस
By admin | Published: July 30, 2016 4:28 AM