सुमद्राच्या साक्षीने २०१९ निरोप; पर्यटनस्थळे गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:48 PM2019-12-31T23:48:26+5:302019-12-31T23:48:36+5:30
आतषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत; विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कार्यक्रम; पर्यटकांनी लुटला आनंद
अलिबाग : जिल्ह्यात ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अलिबाग समुद्रकिनारी रात्री १२ नंतर स्थानिकांसह पर्यटकांनी अथांग सागराला साक्षी ठेऊन सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर काहींनी ढोलताशाच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला. पहाटे उशिरापर्यंत सर्वत्र सेलिब्रेशनची चांगलीच धुम सुरु होती.
ख्रिसमसला सलग सुट्ट्या आल्याने त्या सुट्ट्यांची नशा उतरत नाही. तोच नववर्षाच्या स्वागताची झिंग मंगळवारी सकाळपासूनच सर्वांवरमध्ये आल्याचे दिसत होते. पर्यटकांनी अलिबाग शहरातील रस्ते गजबजून गेले होते. हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग पर्यटकांनी तुडुंब भरले होते. मद्य विक्रीच्या दुकांनामध्ये तळीरामांचा महापूर आला होता. रेशनिंगवरील धान्य घेण्यासाठी जशी गर्दी असते त्याचप्रमाणे नंबर लावून मद्य विकत घेणाऱ्यांची संख्येने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, किहीम, काशीद, मुरुड, श्रीवर्धनचे समुद्रकिनारे, तसेच माथेरान अशी सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली होती. घोडेस्वारी, घोडागाडी, उंटाची सफर, स्पीड बोटीचा थरार, एटीव्हीची राइड अशा मनोरंजनांच्या साधणांचा आनंद पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्व संधेला लुटला.
समुद्रकिनारी भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, मसाला डोसा, सॅण्डविच, फ्रँकरोल असे विविध स्टॉल खवय्यांनी चांगलेच खचाखच भरले होते. विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले होते. संगीताच्या तालावर नाचत आणि मद्याचे पेले रिचवत तरुणाईसह वयोवृद्धांनीही सेलिब्रेशनची चांगलीच धूम अनुभवली. काही पार्ट्या या सकाळपर्यंत रंगल्या होत्या.
उलटे आकडे मोजत बारा वाजून एक सेकंदांनी अथांग समुद्राच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले.
एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर काहीचे मोबाइल खणखणत होते. कुटुंबापासून दूर असणाऱ्यांनी आपापल्या नातेवाइकांना शुभेच्छा दिल्या.
डिजेच्या तालावर थिरकले पर्यटक
रेवदंडा : सरत्या वषार्ला निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून पर्यटक दाखल झाले असून यामध्ये तरु णांची हजेरी मोठ्या प्रमाणावर आहे.
गेले तीन दिवस ढगाळ हवामान असतानाही पर्यटकांचा आनंद ओंसडून वाहत आहे. काही पर्यटक तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शनिवारपासून मुरुडमध्ये दाखल झाले आहेत.
यंदा लागून आलेल्या सुट्ट्यांचा पर्यटकांनी चांगलाच फायदा घेतला. समुद्रकिनारी रात्री उशिरापर्यंत डिजेच्या तालावर पर्यटक थिरकत होते. अनेक दुकानदारांनी, तसेच समुद्रकिनाºयावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.