वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:07 AM2018-04-19T01:07:46+5:302018-04-19T01:07:46+5:30

तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, पुनाडेवाडी, कोंझर, कोंडरान, मांघरून, वाकी, शिवथर आदी १९ गावांना वादळाचा तडाखा बसला.

19 villages of Windy rain, Pankanema started by Mahad revenue; Mango bourgeois concern | वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

Next

दासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने महाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. रायगड किल्ला परिसरातील पाचाड गाव, बौद्धवाडी, मोहल्ला, पाचाड नाका येथील घरांचे वादळामुळे नुकसान झाले. महाड महसूल विभागाकडून घरांचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती महाड तहसीलचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.
महाडमध्ये मंगळवारी दुपारनंतर अचानक वादळाने आणि गारांच्या पावसाने शेतकरी आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, पुनाडेवाडी, कोंझर, कोंडरान, मांघरून, वाकी, शिवथर आदी १९ गावांना वादळाचा तडाखा बसला.
पाचाडमधील शासकीय विश्रामगृह आणि भांडारगृहाचे पत्रे उडून गेले. कोंझर येथील अंगणवाडीचे नुकसान झाले आहे. दासगावमधील पत्रावाडीतील विनोद कर्जावकर यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. वाघोली गावात दोन घरांचे आणि गोठ्याचे नुकसान झाले. वादळाने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
महाड महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. शिवाय, महाड कृषी विभागानेही पीक नुकसान पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आंबा उत्पादन धोक्यात
च्महाड तालुक्यात वादळाने रायवळी आणि कलमी आंब्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याकडेला असलेल्या आणि स्वमालकीचे रायवळी आंबे वादळाने गळून पडले, तर कलमी उत्पादन घेणाºया शेतकºयांनाही पावसाचा फटका बसला. कलमी आंबे आता बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच गारा पडल्याने हे आंबे खराब होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.

ढगाळ वातावरणामुळे माथेरानचा पारा वाढला
च्माथेरान : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी बदलत्या हवामानाचा फटका या पर्यटनस्थळालाही बसला आहे. बुधवारी माथेरानमधील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकही हैराण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी शहरात पावसाची शक्यता वर्तवली होती.

Web Title: 19 villages of Windy rain, Pankanema started by Mahad revenue; Mango bourgeois concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.