१९ कामगारांना नोकरीवरून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:20 AM2018-04-28T06:20:46+5:302018-04-28T06:20:46+5:30
सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे.
रोहा : धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीने १९ कायमस्वरूपी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर बेकारीची कुºहाड तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीतील प्लॉट नं. १०१ व १०२मध्ये व्हिटामिन्स (औषध निर्मिती) करणारे बी-२ व मॅटफॉरिमन हे दोन प्लांट बंद करण्याचा आदेश कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. दोन्ही प्लांटवर काम करणाºया १९ कायमस्वरूपी कामगारांना बुधवारी तडकाफडकी कमी केले. तर कंपनीचा आर.पी.एस. प्लांट सध्या सुरू आहे. मात्र, या प्लांटमधील उत्पादननिर्मिती प्रक्रिया बंद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे. त्यामुळे उर्वरित १४ कामगारांवर सध्या कंपनीतील कामाचा भार सोपविण्यात आला आहे. याआधी सॉल्वे, रेप्टाकॉस, पेप्सी, सुदर्शन इंडस्ट्रीज कंपनी व अन्य कंपन्यांनी कामगारांना तडकाफडकी काढल्याचे प्रकार घडले आहेत.