गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

By निखिल म्हात्रे | Published: October 29, 2023 05:01 PM2023-10-29T17:01:47+5:302023-10-29T17:02:09+5:30

दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही.

19,000 beneficiaries back to Shidha for happiness in Ganeshotsav 95.70 percent allocation in Raigad district within a month | गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

 अलिबाग - दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही. रायगड जिल्ह्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 95.70 टक्के संचांचे वाटप झाले आहे. 19 हजार 392 संच अद्यापही शिल्लक आहेत. सर्वात जास्त वाटप कर्जत तालुक्यात तर सर्वात कमी वाटप पनवेल तालुक्यात झाले आहे. आगामी दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटपासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व एक लीटर खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले संच ‘आनंदाचा शिधा’ गणेशोत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या एक दोन दिवस आधी रास्तभाव धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला.

रायगडसाठी शंभर टक्के म्हणजेच 4 लाख 29 हजार 854 संच उपलब्ध झाले होते. वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. तरीही गणेशोत्सवाच्या एक-दोन दिवस आधीपासून रायगड जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू झाले होते.  त्यानंतर 2 आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 82 टक्के वाटप झाले होते. कर्जत तालुक्यात सर्वाधिक तर तळा तालुक्यात कमी वाटप होते. तर 11 आॅक्टोबरपर्यंतही संचांचे पूर्ण वाटप होऊ शकलेले नाही. त्यात थोडीफार वाढ होऊन हे वाटप 87.18 टक्केपर्यंत पोहोचले आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप सुरू होऊन जवळजवळ आता एक महिना होत आला आहे. तरीही रायगड जिल्ह्यात 19 हजार 392 लाभार्थींनी आनंदाचा शिधा संच घेतले नाहीत. जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 4 लाख 29 हजार 854 लाभार्थ्यांना 100 टक्के शिधा संच उपलब्ध झाले होते. मात्र त्यापैकी 95.70 टक्के अर्थात 4 लाख 10 हजार 462 संचांचे वाटप झाले आहे.

वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे संच रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. त्यात गणेशोत्सवात आलेल्या सुट्टया व गणेशोत्सवात जिल्ह्यात आलेले चाकरमानी यांच्यासाठी असलेला शिधा न घेताच ते पुन्हा शहराकडे रवाना झाल्याने आनंदाचा शिधाचे संच शिल्लक रहाण्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शिल्लक रहाणारे आनंदाचे शिधाचे संच जेथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे त्याच किमतीत वाटप करण्यात येईल असे पुरवठा विभागाने म्हटले होते. मात्र अद्यापही 19 हजार 392 लाभार्थ्यांनी आपले संच घेतलेलेच नाही. सध्या पामतेलाचा घरगुती खाद्य पदार्थांमध्ये वापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेही नागरिक आनंदाचा शिधा घेण्यास रस दाखवत नसल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात शिल्लक संच संख्या (वाटपाची टक्केवारी)
कर्जत - 574 (98.62), म्हसळा - 195 (98.35),  उरण - 2233 (97.82),  श्रीवर्धन - 1340 (96.94),  मुरुड - 270 (98.34),  रोहा - 2129 (93.05),  अलिबाग - 1693 (95.85),  खालापूर - 3241 (93.65), पनवेल - 7182 (91.41),  माणगाव - 1891 (97.50),  पेण - 965 (97.62), पोलादपूर - 745 (92.41),  सुधागड - 1548 (91.43),  महाड - 1609 (97.92),  तळा - 508 (94.62),  एकूण- 19392 (95.70).

Web Title: 19,000 beneficiaries back to Shidha for happiness in Ganeshotsav 95.70 percent allocation in Raigad district within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड