शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खारभूमी योजना : संरक्षण बंधाऱ्यांसाठी ६४ कोटी;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:25 PM

पेणमधील १३८८ हेक्टर नापीक क्षेत्र पुन्हा येणार लागवडीखाली

दत्ता म्हात्रे

पेण : राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्पाअंतर्गत पेण तालुक्यातील नारवेल बेनवले खारभूमी योजनेतील समुद्राच्या लाटांनी उद्ध्वस्त झालेले संरक्षक बंधाऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी शासनाकडून ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयांचा घसघसीत निधी मंजूर झाला आहे. तब्बल १६.७५ किमी लांबीच्या संरक्षक खारभूमी बंधाºयाचे बळकटीकरण याद्वारे होणार असून लवकरच पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरु होणार असल्याचे खारभूमी विभागाच्या कार्यालयीन सूत्रांनी लोकमतला माहिती देताना सांगितले. पेण शिवाय अलिबाग तालुक्यातील काचळी पिटकिरी खारभूमी योजनेसाठी सुध्दा १२ कोटी ७९ लाख ६४ हजार १८४ रुपयांच्या निधी मंजूर झाला असून जिल्ह्यासाठी एकूण ६४ कोटी ५५ लाख ८६ हजार असा निधी राज्य शासनाकडून मंजूर झालेला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील १७२२ हेक्टर नापीक झालेली जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्याचा निर्धार राज्य शासनाचा असल्याने शेतकºयांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

पेण तालुक्यातील नारवेल बेनवले योजनेमध्ये काळेश्रीपासून ते थेट घोडाबंदर, तामसी बंदरपर्यंत १६.७५ किमी लांबीचा खारभूमी संरक्षक बंधारा अतिवृष्टी तसेच समुद्राला आलेली उधाण भरती व अवजड जलवाहतूक यामुळे वेगवान वाºयांसोबत समुद्रात उसळणाºया लाटांच्या प्रहाराने फु टला. यामुळे सुमारे १३८८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीत खारे पाणी घुसून गेली पाच सहा वर्षे ही शेतजमिनी नापीक झाली होती. राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्पाअंतर्गत या बाधित झालेल्या नापीक शेतजमिनीचा प्रस्ताव व शेतकºयांचे झालेले नुकसान याबाबतचा पाहणी अहवाल आघाडी सरकारच्या राजवटीत तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करुन याबाबत खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबूतीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलेले होते. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन राज्यात युतीचे सरकार आले आणि या प्रस्तावाला गती मिळाली. विद्यमान खारबंधारे मंत्री दिवाकर रावते यांनी सुध्दा याबाबतीत पुढाकार घेत खारभूमी संरक्षक बंधारे मजबुतीकरणासाठी व नापीक झालेले क्षेत्र पुन्हा लागवडी योग्य करुन देण्यासाठी प्रयत्न केले. २०१५-१६ मध्ये शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाला अखेर २०१९ मध्ये न्याय मिळाला आणि पेणमधील नारवेल बेनवले खारभूमी योजनेसाठी ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयाच्या निधी मंजूर झालेला आहे.

लवकरच या कामाचे ई-निविदा टेंडर काढण्यात येणार असून पावसाळा संपता क्षणी थेट काळेश्री बंदरापासून बहिराम कोटकपर्यंतच्या ६ महसुली गावे व १३ वाड्यांवरील तब्बल १३८८ हेक्टर क्षेत्र पुन्हा लागवडी करण्यात आणण्याचे उद्दिष्ट खारभूमी कार्यालयाने ठेवलेले आहे. २०२० च्या मे अखेरपर्यंत या बंधाºयांचे मजबूतीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस खारभूमी विभागाचा आहे. खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भदानी यांनी यासाठी तातडीने लक्ष घातले असून नापीक झालेले क्षेत्र पुन्हा लागवडी योग्य करण्याकडे खारभूमी विभागाचा उद्देश असल्याचे सांगितले.

उधाण भरतीपासून शेतीचे संरक्षणकाळेश्री बंदरापासून बंधाºयांचे बळकटीकरण चारचाकी वाहन जाईल अशा क्षमतेचे राहणार असून उर्वरित शेतजमीन शेतकरी बांधवांकडून घेतली जाणार आहे. त्या जागेवर शेतकºयांचीच मालकी राहणार असून फक्त समुद्राच्या लाटांच्या प्रहारापासून व मोठ्या उधाण भरतीपासून शेतीचे संरक्षण होईल अशा पध्दतीने या खारभूमी संरक्षक बंधाºयांचे काम केले जाणार आहे. त्यामुळे काळेश्री, कोन्होबा, तुकारामवाडी, कोळीवाडा, भाल-विठ्ठलवाडी, मोठे भाल, घोडाबंदर, तामसीबंदर, लाखोला, ठाकूरबेडी, मंत्रीबेडी, बहिरामकोटक, मळेघरवाडी व इतर वाड्यांच्या परिसरातील १३८८ हेक्टर क्षेत्रावरील नापीक शेतजमिनीला संजीवनी मिळणार आहे.

खारभूमी योजना शेतीसाठी वरदानशेतकरी बांधवांसाठी नारवेल बेनवले खारभूमी योजना येत्या काळात शेती पिकण्यायोग्य होण्यासाठी वरदान ठरणार आहे. पेण तालुक्यात एकूण ३० खारभूमी योजना असून खारभूमी क्षेत्र ६५७३ हेक्टर क्षेत्र आहे. बºयाच योजनांचे देखभाल दुरुस्तीची कामे खारभूमी विभागाकडून करण्यात येत असून काही योजनांची कामे झाली आहेत, तर काही योजनांची कामे प्रगतिपथावर आहे, असे खारभूमी विभागाच्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.