शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

By निखिल म्हात्रे | Published: December 17, 2022 6:10 PM

मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत.

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील 240 पैकी 191 सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १६) मतदान होणार आहे. 240 सरपंचपदासाठी 531 उमेदवार तर 1 हजार 940 सदस्यपदासाठी 3 हजार 238 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. 618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. रविवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी १६ डिसेंबर 2022 रोजी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अलिबाग 06,मुरुड 05, पेण 26, पनवेल 10, उरण 18, कर्जत 07, खालापूर 14, रोहा 05, सुधागड 14, माणगाव 19, तळा 01, महाड 73, पोलादपूर 16, म्हसळा 13, श्रीवर्धन 13या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. 240 पैकी मुरुड मधील 01, पेण 02 उरण 01, माणगाव 03, महाड 22, पोलादपूर सात अशा पन्नास ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. थेट सरपंचपदासाठी नागरिकांमधून निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांनी भर दिला होता; मात्र असे असले तरी मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मतदानात मतदार हा कोणाच्या बाजूने आपले मत पारड्यात टाकणार हे सोमवारी १७ डिसेंबर रोजी कळणार आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्त 

निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 618 मतदान केंद्रांवर 3 हजार708 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 30 संवेदनशील केंद्र असून याठिकाणीही प्लाटुन, दंगल पथक, शीघ्र कृतीदल तैनात केले आहे. निवडणूक आयोगामार्फत मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागVotingमतदानElectionनिवडणूक