झाड कोसळून २० विद्यार्थिनी जखमी

By admin | Published: June 29, 2017 01:51 AM2017-06-29T01:51:49+5:302017-06-29T01:51:49+5:30

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रूक गावातील वरदायिनी माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी झाड कोसळून पडल्याने

20 women injured in tree collapse | झाड कोसळून २० विद्यार्थिनी जखमी

झाड कोसळून २० विद्यार्थिनी जखमी

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रूक गावातील वरदायिनी माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी झाड कोसळून पडल्याने २० विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यापैकी १८ विद्यार्थिनींवर औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर दोन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
गावातील नवतरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी जखमी विद्यार्थिनींना मिळेल त्या वाहनाने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शाळेच्या पटांगणात सामुदायिक प्रार्थना होते. प्रार्थना सुरू असताना अचानक जोराचे वारे वाहू लागले. तेव्हा मागील बाजूला असलेले २५ ते ३० फूट उंचीचे झाड विद्यार्थिनी उभ्या असलेल्या बाजूला कोसळले.

Web Title: 20 women injured in tree collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.