- आविष्कार देसाईरायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील खारबंधिस्ती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तब्बल २०० एकर शेतामध्ये खारे पाणी घुसून भाताचे पीक नष्ट झाले आहे. एमआयडीसीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे पीक हातातून निसटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा एमआयडीसीच्या मुंबई, ठाणे खारभूमी आणि पेण खारभूमी येथील कार्यालयांवर शेतकरी धडक देतील आणि संबंधित अधिकाºयांना करपलेल्या भाताचे पीक देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे. शहापूर, धेरंड, धाकटे शहापूर येथील शेतजमिनी, गाव, शाळा या समुद्राच्या उच्चतम भरती रेषेच्या २ मीटर खाली आहेत. समुद्राचे पाणी अडविण्याचे काम शेकडो वर्षांपासून या ठिकाणचे संरक्षण बंधारे करीत आहेत. शहापूर-धेरंड येथील ३८७.८७ हेक्टर जमिनी २००९ साली एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या आणि गावांच्या संरक्षणासाठी असलेल्या बांधांची जबाबदारीदेखील एमआयडीसीकडेच आहे. त्यांनी ती जबाबदारी २०१९ पर्यंत घेतली नसल्याने ही जबाबदारी गावकºयांनी घेतली होती. गावकºयांनी स्वखर्चाने तेथील बंधाºयांच्या डागडुजी केली आहे.डिसेंबर २०१९ मध्ये या बांधांची जबाबदारी एमआयडीसीने घेतल्यानंतर या बांधांचे नूतनीकरण केलेच नाही; शिवाय बांधांची दुरुस्तीदेखील केली नाही. त्यामुळे गाव आणि शेती वाचविण्यासाठी शेतकºयांंनीच पुढाकार घेतला. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत एमआयडीसीच्या विनंतीवरून शेतकºयांनी ज्या बांधांची दुरुस्ती केली. त्याची सुमारे ७ लाखांहून अधिक रुपयांची मजुरी एमआयडीसीने अद्याप दिलेली नाही.२००९ ते २०१८ पर्यंत जमिनीत प्रकल्प न आल्याने तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या अधिनियमानुसार निर्वाहभत्ताही एमआयडीसीने दिलेला नाही. रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने शेतकºयांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आॅगस्ट २०२०नंतर आत्तापर्यंत सुमारे ११ ठिकाणी खारबंदिस्ती फुटली. त्याची योग्य वेळी दुरुस्ती न केल्यामुळे समद्राच्या उधाणाचे खारे पाणी शेतामध्ये घुसत आहे. सततच्या पाणी येण्याने खारबंदिस्ती आणखी कमकुवत होऊन ती फुटण्याचे प्रमाण वाढले. सप्टेंबर महिन्यात आलेल्या उधाणामुळे तर २०० एकरातील भाताचे पीक नष्ट झाले आहे. पेण खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.उपाययोजना न केल्यास आंदोलन२०० एकरमधील हातात आलेले पीक सततच्या खाºया पाण्यामुळे करपले आहे. नोकरी नाही, शेती नाही आणि कोणताच रोजगार नाही. डोळ्यांत मात्र अश्रू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड प्रमुख राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एमआयडीसी आपल्या कर्तव्यापासून पळत आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.४० लाख रु पयांचे नुकसान : एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भाताचे उत्पादन येते. एक क्विंटल भाताला सुमारे एक हजार रुपयांचा दर बाजारात मिळतो. त्यानुसार २०० एकरात चार हजार क्विंटल उत्पादन येते. म्हणजेच चार हजार गुणीले एक हजार बरोबर ४० लाख रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते.
२०० एकरमध्ये घुसले खारे पाणी; एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे भातपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:05 AM