शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

गणेशभक्तांसाठी २०४३ विशेष बस

By admin | Published: September 04, 2016 3:29 AM

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर

- जयंत धुळप, अलिबाग

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या पाच दिवसांत परिवहनच्या २०४३ बसमधून सुमारे १ लाख २ हजार १५० गणेशभक्त कोकणात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रायगड विभागाचे नियंत्रक विजय गीते यांनी दिली आहे.नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त शुक्रवारी ३२७ जादा बसमधून १६ हजार ३५० प्रवासी कोकणात रवाना झाले आहेत. शनिवारी सर्वाधिक प्रवासी कोकणात रवाना होत आहेत. शनिवारी १ हजार ४३९ जादा बसमधून तब्बल ७१ हजार ९५० चाकरमानी गणेशभक्त कोकणात जाणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात एका दिवसातील ही विक्रमी प्रवासी वाहतूक आहे. रविवार, ४ सप्टेंबर रोजी १९० जादा बसमधून ९ हजार ५०० गणेशभक्त कोकणात रवाना होतील. गणेशचतुर्थीच्या दिवशी ५० ते ५५ बसमधून २ हजार ५०० ते २ हजार ७५० गणेशभक्त कोकणात पोहोचणार आहेत. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाकरिता रायगड एसटी विभागांतर्गत ३८४ जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. ३८४पैकी सर्वाधिक १३० बस ११ सप्टेंबर रोजी सुटणार आहेत. श्रीवर्धन आगारातून जिल्ह्यात तब्बल ११७ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. माणगावमधून ७७, मुरूड आगारातून ६५, रोहा एसटी आगारातून ४१, महाड येथून ४५, अलिबाग आगारातून ३५ तर पेण एसटी आगारातून २ विशेष बस सोडण्यात येणार आहेत. महामार्गाची खड्डेमय अवस्था पाहता, मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ३०० ते ४५० किमीच्या थेट प्रवासात २०४३ बस पाच दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी असतील. एसटीमध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यता विचारात घेऊन, रामवाडी (पेण) आणि इंदापूर (माणगाव) येथे एसटी रायगड विभागाचे विशेष दुरुस्ती पथक तर वाकण (नागोठणे) व पोलादपूर येथे एसटी रायगड विभागाचे विशेष गस्ती व दुरुस्ती पथक २४ तास तैनात ठेवण्यात आले आहे. जिल्हांतर्गत पर्यायी मार्गमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांकरितादेखील पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.१)खोपोली-पालीफाटा-पाली-वाकण-सुकेळी-महाड२)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-कोलाड-महाड३)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर-महाड४)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर- करंबळी-ताम्हाणे-मुगवळीफाटा-महाड५)खोपोली-पेण-वडखळ-सुकेळी-महाड६)पनवेल-पेण-वडखळ, पेझारी-आय.पी.सी.एल.-नागोठणे-वाकण-महाड७)पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण८)वाकण-भिसेखिंड-रोहा-कोलाड-महाड९)वाकण-भिसेखिंड-रोहा-तांबडी-वाली-तळा-इंदापूर-महाड१०)माणगाव-मोर्बो-दहिवली-गोरेगाव-लोणेरे-महाड११)माणगाव-म्हसळा-आंबेत-म्हाप्रळ-मंडणगड, खेड१२)महाड-राजेवाडी, नातूनगर-खेड या १२ मार्गांचा समावेश आहे.महामार्गास पर्यायी मार्गमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर (माणगाव) या दुरवस्थेतील महामार्गास टाळण्याकरिता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-खालापूर पाली-वाकण-माणगाव-महाड व पुढे.. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा उंब्रज-पाटण-चिपळूण मार्गे पुढे..मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-मलकापूर-अंबाघाट मार्गे रत्नागिरी.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली व पुढे.. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी, असे पर्यायी मार्ग कोकणात जाण्याकरिता वाहनचालकांना सुचविण्यात आले आहेत. महामार्गांच्या टोलच्या मुद्द्यावर कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.