कर्जत : मावळ लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे सात आणि अकरा अपक्ष उमेदवार येत्या २९ एप्रिल रोजी आपले नशीब आजमावणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे सात आणि अकरा अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये पुण्यामधून सर्वाधिक ८ उमेदवार उभे आहेत, पनवेलमधून ४ उमेदवार, मावळमधील २, खारघरमधील २, खालापूरमधील १, उरणमधील १, वाशीममधील १ , बारामतीमधील १ उमेदवार आणि कर्जतमधील १ असे उमेदवार आहेत.
शिवसेना - श्रीरंग चंदू बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस - पार्थ अजित पवार, बहुजन समाज पार्टी - अॅड. संजय किसन कानडे, क्रांतिकारी जयहिंद सेना - जगदीश श्यामराव सोनवणे, आंबेडकर राईट्स पार्टी आॅफ इंडिया - जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पक्ष - पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेना - प्रकाश भिवाजी महाडिक, भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष - मदन शिवाजी पाटील, वंचित बहुजन आघाडी - राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी - सुनील बबन गायकवाड, अपक्ष - अजय हनुमंत लोंढे, अमृता अभिजित आपटे, नवनाथ विश्वनाथ दुधाळ, प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुमंत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पोळ असे २१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत शिवसेना- भाजप-आरपीआयचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना-आरपीआय कवाडे - मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्यामध्ये होईल, असे बोलले जात आहे.
मतदानासाठी जनजागृतीजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा व महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान जनजागृती’ मोहीम राबविली जात आहे. महासेवाचे महासेवक मुंबई शहर, उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये जाऊन ‘मतदानाची सुट्टी ही वाया घालवू नका, मतदान केंद्रात जाऊन आपला हक्क बजावा,’ असा संदेश देत आहेत. या मतदान जागृती मोहिमेत एकूण ६६ महासेवक सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान जनजागृतीचे पत्रक देण्यात आले आहेत.