अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २१ शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक दहा अनधिकृत शाळा पनवेल तालुक्यात आहेत, तर अलिबाग तालुक्यात एक, पनवेल-रोहा तालुक्यांत दोन, म्हसळा तालुक्यात चार, कर्जत व मुरुड तालुक्यात प्रत्येकी दोन शाळा अनधिकृत आहेत. या संबंधित शाळाचालकांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरू करू नये, तसेच पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाचा अधिकारी कायदा २००९ व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पालकांनी जागरूक राहून पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत विद्यालयात घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील याची पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही दराडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत शाळा
- मदर केअर एज्यु.सो. किंडर ड्रिम्स प्री-स्कूल, नागाव, अलिबाग.
- आनंदी दिनकर कोळी शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई, पनवेल
- आरोसे इंटरनॅशनल स्कूल, वहाळ, पनवेल.
- लेट चांगूनाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्यु. सोसायटी, वहाळ, पनवेल
- पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर गव्हाण, पनवेल.
- होली स्पिरीट इंग्लिश मीडियम स्कूल, आपटा, पनवेल.
- वेदान्त पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल.
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.सी.),पनवेल.
- गिरीराज सिंग सोलंकी पब्लिक स्कूल, लोधीवली, पनवेल.
- शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल आदई, सुकापूर, पनवेल.
- कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजे, पाचनंद, पनवेल.
- रायगड एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, खुटल, रोहा.
- ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल, खांब, रोहा.
- इकरा इस्लामिक स्कूल अॅण्ड मकतब, म्हसळा
- न्यू इंग्लिश स्कूल लिपणी वावे ऊर्दू, म्हसळा.
- अल इशान इंग्लिश स्कूल, म्हसळा.
- सुरेश ग. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा.
- कृष्णा सेवाभावी सामाजिक संस्था कर्जत.
- होली ट्रीनिटी फाउंडेशन, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल वेगांव रोड, दहिवली, कर्जत.
- रॉयल एज्यु.सो.डॉ.ए.आ.उन्ड्रे इंग्लिश मीडियम स्कूल बोर्ली-मांडला, मुरु ड.
- अंजुमन इस्लाम जंजिरा प्री-प्रायमरी स्कूल, पंचक्रोशी, मुरुड.