आदर्श ग्राम स्पर्धेसाठी २२ ग्रामपंचायतींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:08 AM2019-07-19T00:08:45+5:302019-07-19T00:08:49+5:30
पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत (व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फाउंडेश्न) पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील जिल्हा स्वयं मूल्यांकन, मासिक प्रगती अहवाल आणि विभागाच्या बऱ्याच गावांमध्ये सामाजिक, आर्थिक, भौतिक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. या ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्राम निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श ग्राम स्पर्धा ज्या जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्या गावांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी गावातील कामांचे स्वमूल्यांकन करून त्याचा प्रस्ताव आणि व्हिडीओ गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. त्या व्हिडीओची पुन्हा एकदा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातर्फे छाननी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये १२ जिल्ह्यातून तीन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड आदर्श ग्राम स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ११ जुलै ते २० जुलैपर्यंत व्हीएसटीएफ ग्रामपंचायतींनी आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर २२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान समिती ग्रामपंचायतींची पाहणी करून, वस्तुस्थितीवर आधारित मूल्यांकन करून त्यांना गुणांकन देतील. १ आॅगस्ट ते ७ आॅगस्ट या कालावधीत जिल्हा अभियान परिषद उत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींचा छायाचित्रांसह
प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करतील. १० आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान राज्यस्तरावरून ग्रामपंचायतींची तपासणी आणि मूल्यांकन करण्यात येणार आहे.
राज्यस्तरावरून या ग्रामपंचायतींचे अंतिम गुणांकन करून, संबंधित ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर समारंभपूर्वक रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आदर्श ग्राम निर्माण करताना ज्या जिल्ह्यांनी जास्तीत जास्त सरकारी योजनांचे कृती संगम केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना सुध्दा सन्मानित करण्याचा विचार होईल. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांनासुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे.
।‘ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळेल’
व्हीएसटीएफमधील ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही योजना दीड वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियान यशस्वीपणे काम करत आहे.
ज्या गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधादेखील नाहीत अशा गावांमध्ये ग्रामपरिवर्तक जाऊन विकासकामांना गती देत आहेत. त्यामुळे या सर्व लोकांच्या व गावांच्या कामांची दखल घेण्याकरिता आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेला ग्रामपंचायतींकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असे महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम म्हणाले. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांचाही सन्मान होणार.