अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात सरपंच व सदस्यपदांच्या एकूण ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १२१ ग्रामपंचायातींच्या सरपंच व सदस्यांच्या एकूण १२२० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे.१२१ ग्रामपंचायतींच्या १२१ सरपंचपदासाठी छाननीपर्यंत ४१७ तर ११०१ सदस्यपदांसाठी असे एकूण २४६२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. १५ सप्टेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता जिल्ह्यातील निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील १२१ पैकी अर्ज मागे घेतल्यानंतर अलिबाग तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्यांसह ७० जागांसाठी, मुरुड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमधील ५, पेण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीमधील ४४, पनवेल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीमधील ७८ जागांसाठी, उरण तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमधील ३४, कर्जत तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमधील ९१, खालापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमधील ३७, माणगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये ४२, तळा तालुक्यात ९ ग्रामपंचायतीमध्ये २७, रोहा तालुक्यात १९ ग्रामपंचायतीमध्ये १४१, सुधागड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमध्ये १६, महाड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीमध्ये ४२, पोलादपूर तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमध्ये २२, म्हसळा तालुक्यात ५ ग्रामपंचायतीमध्ये ३६ अशा १४ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांच्या ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअंती एकच उमेदवार अर्ज शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील १२१ पैकी अलिबाग ६, मुरुड ३, पेण १३, पनवेल ५२, उरण ११, कर्जत ५३, खालापूर ३, माणगाव ६६, तळा ७७, रोहा ६८, सुधागड ४८, महाड ६१, पोलादपूर २०, म्हसळा १२ अशा १४ तालुक्यांत एकूण ४९३ जागा बिनविरोध झाल्या आहेत.सरपंच व सदस्यपदांसह पेण तालुक्यातील २, पनवेल-२, कर्जत-१, तळा-४, रोहा-३, सुधागड-२, महाड-७, पोलादपूर-१ अशा २२ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. गणेशोत्सव उत्सव सुरू असल्याने गणपतीच्या दर्शनाचे निमित्त करून मतदारांना भेटून उमेदवार सध्या प्रचार करीत आहेत. बुधवार, २६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान होणार आहे तर मतमोजणी गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी होणारआहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून अनेक राजकीय मंडळांनी सार्वजनिक मंडळांचा प्रचारासाठी आधार घेतला आहे.
जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध; ६८५ जागांकरिता होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:50 AM