कर्नाळा अभयारण्यातील २२४ पक्षी, प्राण्यांची झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:21 PM2019-05-20T23:21:19+5:302019-05-20T23:22:00+5:30
बिबट्याचे दर्शन नाही : वावर असल्याचा वन्यजीव विभागाचा दावा; १२ तासांत कॅमेरांद्वारे केली गणना
पनवेल : बुद्ध पौर्णिमेनिमित्त शनिवारी कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेत ३७ प्रजातीचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या गणनेत ४१ प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली होती. गणनेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन घडले नसले तरी या अभयारण्यात नियमित वावर असल्याचा दावा कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी केला आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्यात भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रानकोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. सुमारे १२.१५५ चौरस किलोमीटरच्या परिसरात असलेल्या या अभयारण्यात स्थानिक तसेच स्थलांतरित १४७ प्रजातीचे पक्षी राहतात. यात ३७ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास असल्याचे समोर आले आहे. कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. गेल्या वर्षी सुमारे ८८ हजार पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली होती. या अभयारण्यातील प्राण्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी सकाळी ७ ते रविवारी ७ या वेळेत कॅमेरे सुरू ठेवण्यात आले होते.
बुलबुल ११
कोतवाल 0९
किंगफिशर 0५
हळद्या 0७
तुरेवाला बुलबुल १४
सनवर्ड 0६
होला १२
वेडाराघू 0४
रातवा 0२
नीळकंठ 0४
निलांबर 0३
ड्रगो 0९
कावळा 0२
महाभ्रुंगराज 0४
मोनार 0१
श्यामा 0४
तकाचोर 0२
निखर 0१
सुतार 0६
शिखरा 0२
बगळा 0२
रानकोंबडा 0४
बारबेट 0३
लिफबर्ड 0५
सातभाई 0६
कोकीळ 0२
वटवाघूळ 0१
टिटवी 0२