शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

विकासासाठी २२७ कोटी

By admin | Published: December 06, 2015 12:24 AM

रायगड जिल्ह्यासाठी २०१६-१७ या वर्षाकरिता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनासाठी एकूण २२७ कोटी ५२ लाख रु पयांचा विकास आराखडा गृहनिर्माण, कामगार, खनिकर्म

- जयंत धुळप,  अलिबाग

रायगड जिल्ह्यासाठी २०१६-१७ या वर्षाकरिता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनासाठी एकूण २२७ कोटी ५२ लाख रु पयांचा विकास आराखडा गृहनिर्माण, कामगार, खनिकर्म मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार जयंत पाटील, सुरेश लाड, भरतशेठ गोगावले, धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर, पंडितशेठ पाटील, मनोहर भोईर, तसेच जिल्हा विकास समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात शासकीय जमिनीवर व रस्त्यावरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्यावा. केबलसाठी खोदलेला रस्ता संबंधित यंत्रणेकडून पूर्ववत करून घ्यावा. आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध होतो का ते पाहावे, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता असून, याबाबत समन्वयाने निर्णय घेण्याचे यावेळी महेता यांनी सांगितले. गाभा क्षेत्राकरिता १०० कोटीया बैठकीत २०१६-१७ या वर्षासाठी मंजूर झालेल्या आराखड्यातील २२७ कोटी ५२ लाख रुपयांपैकी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गाभा क्षेत्र १०० कोटी व बिगर गाभा क्षेत्र ४२ कोटी, नावीन्यपूर्ण योजना व संनियत्रंणासाठी ७ कोटी असे १५१ कोटी ३६ लाख, तसेच आदिवासी उपयोजनेसाठी ५३ कोटी ९९ लाख, तर अनुसूचित जाती उपयोजनांसाठी २२ कोटी १७ लाख असा निधी आहे. त्याचप्रमाणे २०१५-१६ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यासाठी स्वतंत्र ७ कोटी ४९ लाख रुपये इतका नियतव्यय शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. तर मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून जलयुक्त शिवार या योजनेसाठी एक कोटी रु पये रकमेचा धनादेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार एकूण २१ कोटी ६९ लाख रुपयांपैकी ९ कोटी रुपये खर्च झालेला आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.अनधिकृत रेतीउपसा थांबविण्याकरिता संयुक्त मोहीमजिल्ह्यातील मच्छीमारांना शासनाचे मिळणारे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करावी, अशी सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनधिकृत रेतीउपसा हा गंभीर प्रश्न असून, यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने, प्रसंगी विशेष मोहीम राबवून काम करावे. रेतीउपसा होणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील लावण्यात यावे. राज्यात इंदिरा गांधी आवास योजना, रमाई आवास योजना अशा योजनांबरोबरच पंतप्रधान आवास योजना सुरू आहेत. या योजनांतर्गत लाभार्थींना घरे देण्याची कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्याची कुठेही अडचण निर्माण होणार नाही यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीत खासदार, आमदारांनी काही सूचना केल्या.