कर्जतमध्ये बारावी परीक्षेसाठी २२७८ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:06 AM2018-02-22T01:06:30+5:302018-02-22T01:06:30+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया एचएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यातून २२७८ विद्यार्थी बसले असून

2278 students for the Class XII examination in Karjat | कर्जतमध्ये बारावी परीक्षेसाठी २२७८ विद्यार्थी

कर्जतमध्ये बारावी परीक्षेसाठी २२७८ विद्यार्थी

Next

कर्जत : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया एचएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यातून २२७८ विद्यार्थी बसले असून, तालुक्यातील तीन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तीनही केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील अभिनव ज्ञानमंदिर केंद्रावर १०७६ विद्यार्थी, नेरळमधील नेरळ विद्यामंदिर केंद्रावर ८३७ आणि कशेळेमधील भाऊसाहेब राऊत विद्यालय केंद्रावर ३६५ विद्यार्थी असे एकूण २२७८ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी केली होती. आपला कक्ष कुठे आहे, हे पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकच गर्दी केली होती. मुलांच्या माहितीसाठी शिक्षक ध्वनिक्षेपावरून सूचना देत होते. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
परिरक्षक म्हणून आशा खेडेकर, उपपरिरक्षक म्हणून शिवाजी कावरे, तर सहायक परिरक्षक म्हणून संजय सारु क व श्रीकृष्ण लोहाटे काम पाहत आहेत.

Web Title: 2278 students for the Class XII examination in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.