पोलादपूर : तालुक्यात यंदा प्रशासनाने २२५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात २३२ बंधारे बांधण्यात यश आल्याने सध्याच्या उन्हाळी पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना तसेच गुरांची तहान भागविण्यासाठी हे बंधारे यशस्वी झाले असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी दिली आहे. तालुक्यातील १४ गावांनी प्री वॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतला असून, पूर्वी झालेल्या जलसंधारणाच्या कामांची श्रमदानातून दुरुस्ती करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.पोलादपूर तालुक्याला सन २०१७-१८ या वर्षाकरिता २२५ वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३२ वनराई बंधारे बांधण्यात यश आले आहे. चरईमध्ये ३ पैकी ४, मोरिगरी ४ पैकी ४, सडवली ७ पैकी ७, काटेतळी ५ पैकी ३, लोहारे ७ पैकी ४, पार्ले २ पैकी २, तुर्भे खुर्द ७ पैकी ७, तुर्भे बुद्रुक ५ पैकी ५, वझरवाडी ६ पैकी ६, तुर्भे खोंडा ५ पैकी ६, दिविल ६ पैकी ५, सवाद ६ पैकी ६, माटवण २ पैकी २, धारवली ६ पैकी ६, कालवली ५ पैकी ५, धामणदिवी ३ पैकी ३, भोगाव खुर्द ५ पैकी ५, पळचिल ६ पैकी ६, महालगूर ३ पैकी ३, कोंढवी ५ पैकी ५, देवपूर ४ पैकी ६, गोळेगणी ४ पैकी ४, पैठण ३ पैकी ३, परसुले ५ पैकी ५, ओंबळी ५ पैकी ५, कुडपण बुद्रुक ६ पैकी ६, कोतवाल खुर्द ६ पैकी ६, कोतवाल बुद्रुक ६ पैकी ६, कापडे बुद्रुक ८ पैकी ८, महाळुंगे ३ पैकी ३, कापडे खुर्द ५ पैकी ५, चांभारगणी ६ पैकी १२, वाकण ७ पैकी ७, बोरावळे ७ पैकी ५, देवळे ११ पैकी ११, बोरज ६ पैकी ७, मोरसडे ७ पैकी ७, गोवेले ९ पैकी १०, आडावळे बुद्रुक ६ पैकी ७, उमरठ ३ पैकी ४ तर बोरघर १० पैकी १० अशी ४२ ग्रामपंचायतनिहाय वनराई बंधाºयांची उद्दिष्ट साध्यता आहे.पोलादपूर तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यात यंदा प्रथमच तलाव आणि मृद संधारणाचे महत्त्व समजावे आणि लोकसहभागातून पाणीबचतीची चळवळ उभी राहण्यासाठी देवळे, आडावळे खुर्द, साळवी कोंड, गोवले, खांडज, बोरघर, वडघर बुद्रुक, कामथे, सडवली, काटेतळी, कापडे बुद्रुक, बोरावळे आणि ताम्हाणे या १४ गावांमध्ये प्री वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये राबविण्यात येणार असून, यापूर्वी गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांचीश्रमदानातून दुरुस्ती करण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान, पोलादपूर तालुक्यातील नियोजित १४ स्पर्धक गावांमध्ये श्रमदानामधून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळकाढणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
२३२ वनराई बंधारे यशस्वी, पोलादपूर १४ गावांचा प्री वॉटर कप स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:26 AM